पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील कथित गैरप्रकारांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मंगेशकर कुटुंबावर गंभीर आरोप करत राजकीय वादाला तोंड फोडले आहे. वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबाला “लुटारूंची टोळी” आणि “माणुसकीला कलंक” संबोधत, त्यांचे योगदान फक्त गाण्यापुरतेच मर्यादित असल्याचा दावा केला. पुण्यातील एका गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयाने १० लाख रुपये अनामत रक्कम मागितल्याच्या कथित घटनेचा उल्लेख करत वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मंगेशकर कुटुंबाने गरिबांची लूट केल्याचा आरोप केला. “खिलारे पाटलांनी जमीन दिली, पण या नालायकांनी त्यांनाही सोडले नाही,” असे वक्तव्य करत ते आपल्या टीकेत ठाम असल्याचे म्हणाले. (Deenanath Mangeshkar Charity Hospital)
(हेही वाचा – Tariff War : डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन सोडून इतर देशांची आयात शुल्क वाढ का थांबवली? पाहूयात ३ कारणे)
या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तीव्र प्रत्युत्तर दिले. मंगेशकर कुटुंबाचे सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान सर्वश्रुत असल्याचे सांगत पवार यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला. “मंगेशकरांनी संगीत क्षेत्रात देशाचे नाव उंचावले आणि दीनानाथ रुग्णालयासारख्या संस्थांमार्फत समाजसेवा केली. अशा थोर व्यक्तिमत्त्वांवर बिनबुडाचे आरोप करणे चुकीचे आहे,” असे पवार (Ajit Pawar) म्हणाले. त्यांनी वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना राजकीय हेतूने अशी वक्तव्ये टाळण्याचा सल्ला दिला. (Deenanath Mangeshkar Charity Hospital)
(हेही वाचा – Waqf Amentment Act : वक्फबाबत जनजागृतीसाठी भाजपा देशभरात राबवणार ‘वक्फ दुरुस्ती जागरुकता अभियान’ !)
या वादाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. काहींनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याला संतापजनक ठरवत काँग्रेसला माफी मागण्याची मागणी केली, तर काहींनी रुग्णालयातील गैरप्रकारांवर प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे आणि सामाजिक संवेदनशीलता लक्षात घेता, हा वाद येत्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मंगेशकर कुटुंबाने अद्याप या प्रकरणी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. (Deenanath Mangeshkar Charity Hospital)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community