मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिंदे गटातील आमदारांवर शिवसेनेकडून सातत्याने टीका होत आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला. त्याला आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
आदित्य ठाकरे माझ्यापेक्षा निम्म्या वयाचे आहेत तरी ते ज्या-ज्यावेळी तेव्हा मी उठून उभा राहतो. कारण तो त्यांच्या आजोबांचा मान आहे. त्यामुळे आम्ही बोलत नाही याचा अर्थ आमच्याकडे मुद्दे नाहीत असा होत नाही, अशा शब्दांत केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले आहे.
(हेही वाचाः गद्दार कोण? हे वरळी विधानसभेतील मतदारच सांगतील, राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल)
तुम्ही अजून लहान आहात
आमच्यासोबत असलेले प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात जनतेची कामं करुन निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील जनता तुमच्या विरोधात पेटून उठेल. तुम्ही अजून लहान आहात, तुम्हाला अजून कल्पना नाही प्रादेशिक अस्मिता काय असते ते, अशा शब्दांत केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे हे तरुण आहेत. त्यांनी कसं वागावं, कसं बोलावं हे उद्धव ठाकरेंकडून शिकायला हवं. ते जर का इतर लोकांसारखं बोलायला गेले तर त्याने गोष्टी बिघडू शकतात, असा इशाराही दीपक केसरकर यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community