वेदांता जाण्यामागे उद्धव ठाकरेच जबाबदार – दीपक केसरकरांचा आरोप

89

महाराष्ट्रातील १.५४ लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यात शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणी थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. वेदांता प्रकल्प जाण्यामागे उद्धव ठाकरे हेच कारणीभूत आहे, असा आरोप केला.

मराठी माणसांच्या नोकऱ्या जाण्यास उद्धव ठाकरे कारणीभूत

मी स्वतः उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन या प्रकल्पाविषयी विनंती केली होती. या प्रोजेक्टसाठी, उद्योगसमूह चेअरमन यांना उद्धव ठाकरे यांची भेट हवी होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यांना वेळ दिला नाही. कोणत्याही उद्योगपतीची पहिली पसंती महाराष्ट्र असते मात्र गेल्या सरकारच्या अस्थिर राजकारणाने, हा उद्योग गेला. मराठी माणसांच्या नोकऱ्या जाण्यास यांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचे केसरकर म्हणाले.

(हेही वाचा ‘लव्ह जिहाद’प्रकरणी संसदेत विधेयक आणणार – अनिल बोंडे)

महाराष्ट्रापेक्षा गुजरातने अधिक चांगले पॅकेज दिले असावे  

महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी मागील सरकार किती सिरीयस होते ? असा म्हणत दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. हाय लेव्हल परदेशी डेलिगेशनला भेटायला यांना वेळ नव्हता. शरद पवार यांच्यावर बोलणार नाही. मी त्यांचा आदर करतो. मोठा प्रकल्प यावा यासाठी राज्या राज्यात स्पर्धा असते. महाराष्ट्रापेक्षा गुजरातने अधिक चांगले पॅकेज दिले असावे. सुभाष देसाई हे गेल्या सरकारमध्ये उद्योग मंत्री होते त्यांनी काय केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.