पैसे मागणारे, आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप करतात, मी आरोप केल्यानंतर त्याचे उत्तर ते देऊ शकले नाहीत. आमच्याकडे काहीच नाही फक्त जनतेचे प्रेम आहे. त्यांच्याकडे काय आहे, याचे उत्तर त्यांनीच जनतेला द्यावे, असा टोला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
याविषयी केसरकरांना विचारले असता ते म्हणाले, काही लोकांकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. आमच्यावर पैसे घेतल्याचा आरोप करतात, मात्र मी प्रत्यारोप केल्यानंतर साधे उत्तरसुद्धा त्यांना देता आले नाही. या ठिकाणी माझ्यावर खोके घेतल्याचा आरोप झाला, मात्र त्यांनी पैसे घेतले तेच आरोप आरोप करतात, हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
(हेही वाचा – Ajit Pawar : ‘भावी मुख्यमंत्री’ पदावरून अजित पवारांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान; म्हणाले …)
याबाबत जनतेने समजून घ्यावे. माझ्यावर कितीही कर्जाचा बोजा झाला तरी मी चेकच्या माध्यमातून पैसे देतो. माझी तीन पिढ्यांची श्रीमंती आहे. त्यामुळे माझ्यावर बोलणाऱ्यांनी, लिहिणाऱ्यांनी भान ठेवून बोलावे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे तसेच वेळ आल्यावर आणखी बोलू, असे त्यांनी सांगितले.
हेही पहा –