पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवार, १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, हा पुरस्कार पंतप्रधान मोदींनाच का देण्यात येतोय, याबाबतची माहिती लोकमान्य टिळकांचे पणतू दीपक टिळक यांनी यावेळी भाषणात दिली.
“लोकमान्य टिळकांनी स्वतंत्र, आधुनिक आणि बलाढ्य हिंदुस्थानचे स्वप्न पाहिले. राष्ट्रीयत्व, पुरातन विद्या, वैभवशाली इतिहास, राष्ट्रप्रेम, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, स्वदेशी अर्थकारण लोकमान्यांनी सांगितले होते. ते सूत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोककल्याणकारी बलाढ्य राष्ट्रात आम्हाला दिसले. त्यातच आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, नवे तंत्रज्ञान, नवे शैक्षणिक धोरण हे त्यांच्या कार्यक्रमात आढळतात. म्हणूनच आम्ही या पुरस्कारासाठी केलेली निवड तुम्हा सर्वांना भावेल असा विश्वास आहे. हा पुरस्कार स्वीकारला म्हणून आभार मानतो”, असे दीपक टिळक म्हणाले.
(हेही वाचा – Narendra Modi : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा निधी नमामि गंगे प्रकल्पाला देणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी)
पुरस्काराची रक्कम ‘नमामी गंगे’ योजनेला
“ज्यांच्या नावात गंगाधर आहे त्यांच्या नावाने मिळणाऱ्या या पुरस्कारासह मिळणारी रक्कम मी गंगेला समर्पित करत आहे. मी पुरस्कार ‘नमामि गंगे परियोजना’साठी दान देण्याचा निर्णय घेतला आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community