गलवान खो-यात झालेल्या भारत-चीन सैन्याच्या झटापटीच्या घटनेची पुनारवृत्ती झाली आहे. 9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये पुन्हा एकदा भारत-चीनचे सैनिक एकमेकांना भिडले. यामध्ये 30 जवान जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. आता यावर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन दिले.
राजनाथ सिंह म्हणाले की, अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये 9 डिसेंबर 2022 रोजी PLA पिपल्स लिबरेशन आर्मी ट्रुप्सने तवांग सेक्टरच्या यांग परिसरात घुसखोरीचा करण्याचा प्रयत्न केला. चिनी सैन्याच्या घुसखोरीचा भारताच्या सैन्याने निडरतेने प्रतिकार केला. यावेळी दोन्हीकडच्या सैन्यात संघर्ष झाला. भारतीय सैन्याने वीरतेने शत्रुच्या सैन्याला परत जाण्यास भाग पाडले. या संघर्षात दोन्हीकडचे सैनिक जखमी झाले. मात्र, एकाही सैनिकाचा मृत्यू झाला नसून कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले.
भारतीय सैन्य सीमांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध
संरक्षण मंत्री म्हणाले की, हा मुद्दा चीनकडेही गंभीरतेने उचलला गेला आहे. मी सभागृहाला खात्री देऊ इच्छितो की, भारतीय सैन्य आपच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. राजनाथ सिंह पुढे म्हणाले, या लढाईत दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले. मात्र, मी या सदनाला सांगू इच्छितो की, आमचा एकही सैनिक हुतात्मा झालेला नाही किंवा त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. भारतीय लष्करी कमांडर्सच्या वेळीच हस्तक्षेपामुळे, चीनच्या सैन्याने माघार घेतली आहे.
Join Our WhatsApp Community