कोकणात बचावकार्यामध्ये दिरंगाई, न्यायिक चौकशी करा! अतुल भातखळकरांची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांना फोन करून पूरस्थितीचा आढावा घेतला, परंतु निष्क्रिय व घरबसल्या ठाकरे सरकारला मदतीचे पत्र लिहिण्यासाठी २४ तास लागले, असे अतुल भातखळकर म्हणाले. .

मागील ५ दिवसांपासून कोकणात पूर सदृश परिस्थिती असतानाही गुरुवारी, २ जुलै रोजी २ ठिकाणी दरड कोसळली. तरीही राज्य सरकारने नौदल व तटरक्षक दलाला बोलविण्यासाठी शुक्रवारी, २३ जुलै रोजी पत्र दिले, त्यामुळे वेळेत मदत न पोहोचल्यामुळे २०० पेक्षा जास्त नागरिकांचे नाहक बळी गेले. हे अत्यंत संतापजनक असून मुख्यमंत्री व राज्य सरकारच्या या अनास्थेची व दिरंगाईची न्यायिक चौकशी करावी, अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

एक दिवस उशिरा मागितली मदत!

पावसाळा सुरू होतानाच कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी नौदल व तटरक्षक दलाच्या तुकड्या सज्ज असतात, राज्य सरकारकडून त्यांना आदेश येताच ते तात्काळ मदतकार्य सुरू करतात. बुधवारी रात्रीपासून संपूर्ण चिपळूण शहर पाण्याखाली गेले असताना व गुरुवारी सकाळी तळीये येथे दरड कोसळली असताना राज्य सरकारने तात्काळ तटरक्षक दल व नौदलाला मदतीसाठी लेखी आदेश देण्याची आवश्यकता होती. राज्यातील गंभीर पूरस्थिती लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारीच मुख्यमंत्र्यांना फोन करून चर्चा केली व आवश्यक सर्व मदत करण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते. परंतु निष्क्रिय व घरबसल्या ठाकरे सरकारला मदतीचे पत्र लिहिण्यासाठी २४ तास लागले. ही दिरंगाई अक्षम्य असून अजून किती लोकांचे बळी घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला जाग येणार आहे? असा सवाल सुद्धा आमदार भातखळकर यांनी केला आहे.

(हेही वाचा : ३६ तास उलटले तरी आंबेघर मदतकार्यापासून वंचित!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here