Delegation Russia visit : निकाल लागताच सर्वपक्षीय नेत्यांचे वऱ्हाड निघालं रशियाला..

230
Delegation Russia visit : निकाल लागताच सर्वपक्षीय नेत्यांचे वऱ्हाड निघालं रशियाला..
Delegation Russia visit : निकाल लागताच सर्वपक्षीय नेत्यांचे वऱ्हाड निघालं रशियाला..
  • सुजित महामुलकर

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणूकीचा निकाल ४ जूनला लागताच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या राज्यातील प्रमुख नेत्यांचे एक शिष्टमंडळ पाच दिवसांच्या रशिया भेटीवर जाणार असून यामध्ये भाजपा (BJP), शिवसेना (ShivSena) (शिंदे), काँग्रेस तसेच शिवसेना उबाठाच्या (UBT) नेत्यांचा समावेश आहे. (Delegation Russia visit)

(हेही वाचा- Hindutva : आता हिंदुत्व हाच ध्यास आणि श्वास; सेवानिवृत्तीनंतर राजेंद्र वराडकर यांनी व्यक्त केल्या भावना)

निवडणूक संपली, दौरा सुरू

गेले जवळपास दीड-दोन महीने राज्यातील महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते यांच्यात घमासान राजकीय वाकयुद्ध सुरू होते. काही वेळा तर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका-टिप्पणीही झाली. मात्र निवडणूक संपताच एकमेकांच्या हातात हात घालून हे नेते रशियाच्या दौऱ्यावर निघाले आहेत. (Delegation Russia visit)

वडेट्टीवार, अंबादास दानवेही दौऱ्यात

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) (भाजपा) (BJP) यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) (शिवसेना) (ShivSena), विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) (काँग्रेस) (Congress), विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) (शिवसेना उबाठा) (UBT) तसेच काँग्रेस (Congress) आमदार अमिन पटेल (Amin Patel) आणि अन्य काहींचा या शिष्टमंडळात समावेश आहे, असे विधान भवनमधील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. (Delegation Russia visit)

(हेही वाचा- Exit Poll Results 2024: एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ‘या’ पक्षाचे पारडे होणार जड )

रशिया भेटीची पार्श्वभूमी

मुंबई-सेंट पीटर्सबर्ग सिस्टर-कन्सर्न सिटी संबंधांच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र विधान सभा म्हणून राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी १५ ते १८ सप्टेंबर २०२२ दरम्यान रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहराला भेट दिली होती. त्यावेळी नार्वेकर आणि सेंट पीटर्सबर्ग विधानसभेचे उपाध्यक्ष निकोले बोंडारेन्को यांच्यात एक बैठक आयोजित केली गेली. तेव्हा आंतर-संसदीय संबंध विकसित करण्यासाठी आणि विधिमंडळ अनुभवाची देवाणघेवाण करण्यासाठी सेंट पीटर्सबर्ग आणि महाराष्ट्राच्या विधीमंडळांमध्ये सामंजस्य करार करण्यास दोन्ही पक्षांनी सहमती दर्शविली होती. त्याचप्रमाणे उभे पक्षांनी व्यावसायिक संपर्क वाढवून व्यापार आणि आर्थिक संबंध सुधारण्यासाठी काम सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. (Delegation Russia visit)

महाराष्ट्र-सेंट पीटर्सबर्ग विधीमंडळात सामंजस्य करार

नुकतेच इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम यांनी महाराष्ट्र शासनाच्या शिष्टमंडळाला रशियाचे निमंत्रण दिले आहे. या भेटीदरम्यान महाराष्ट्र आणि सेंट पीटर्सबर्ग विधीमंडळात सांस्कृतिक, आंतर-संसदीय संबंध सुधारणा आणि विधिमंडळ अनुभवाची देवाणघेवाण करण्यासाठी करण्यात येणाऱ्या सामंजस्य करारावर सह्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (Delegation Russia visit)

(हेही वाचा- भारतीय नौदलाचे Shivalik Ship सिंगापूरहून रवाना)

पुतिन यांची भेट

विशेष म्हणजे या रशिया दौऱ्यात एका नियोजित कार्यक्रमात महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेता येऊ शकेल तसेच नार्वेकर (Rahul Narvekar) आणि डॉ गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांना यांच्यासमोर विचार मांडण्याची संधी मिळणार आहे, असे एका अधिकाऱ्याने ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले. (Delegation Russia visit)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.