दिल्लीच्या अॅंटी करप्शन ब्युरोने शुक्रवारी आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. याआधी एसीबीने त्यांच्या घरावर आणि त्याच्या इतर 5 ठिकाणी छापे टाकले. छापेमारीत 12 लाख रुपये आणि एक विना परवाना पिस्तुल जप्त केले. दिल्ली वक्फ बोर्ड प्रकरणात एसीबीने छापे टाकले आहेत. दिल्ली वक्फ बोर्ड भरतीतील कथित अनियमिततेची चौकशी करत आहे.
दोन वर्षे जुन्या भ्रष्टाचारी प्रकरणी एसीबीने गुरुवारी ओखला विभागातील आमदार अमानतुल्ला खान यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. खान यांनी 2020 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल झालेलल्या गुन्ह्यात शुक्रवारी दुपारी 12 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष खान यांनी या नोटीसीबद्दल ट्विट केले होते आणि दावा केला होता की, त्यांनी वक्फ बोर्डाचे कार्यालय सुरु केल्यामुळे त्यांना बोलावण्यात आले आहे.
( हेही वाचा: हैदराबाद मुक्तीसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये ध्वजारोहण; मराठवाड्यासाठी केल्या ‘या’ घोषणा )
खान यांच्याशी संबंधित पाच ठिकाणी छापेमारी
शुक्रवारी खान यांच्या घर आणि इतर ठिकाणांवर छापे टाकण्यात आल्याचे एनसीबीच्या अधिका-यांनी स्पष्ट केले. या छापेमारीत एका ठिकाणाहून 12 लाख रुपये रोख, एक विना परवाना शस्त्र आणि काही काडतुसे जप्त करण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले.
कार्यालयात सापडली कागदपत्रे
चौकशीनंतर एसीबीच्या पथकाने खान यांच्याशी संबंधित सुमारे 5 ठिकाणी छापेमारी केली. या छाप्यात खान यांच्या घरातून आणि कार्यालयातून काही कागदपत्रे सापडली आहेत.
Join Our WhatsApp Community