दिल्ली: कंझावाला प्रकरणी पोलिसांनी तातडीने अहवाल सादर करावा; अमित शहांचे आदेश

129

राजधानी दिल्लीत झालेल्या कंझावाला येथील अपघातात तरुणीचा जीव गेला. तरुणीला धडक देणा-या कारने तिला 12 किमीपर्यंत फरफटत नेले. यामुळे तरुणीचा अपघातात मृत्यू झाला. तिचे पाय कापले गेले आणि तिच्या अंगावरचे कपडेही फाटून गेले. तिचा मृतदेह पोलिसांना नग्न अवस्थेत मिळाला. या सगळ्या प्रकरणी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या अपघात प्रकरणाचा विस्तृत अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकी घटना काय?

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दिल्लीच्या कंझावाला भागात एका तरुणीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला. हा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. ही मुलगी स्कुटीवरुन घरी चालली होती त्यावेळी तिला ज्या कारने धडक मारली त्या कारने तिला 12 किमीपर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांना ज्याठिकाणी या तरुणीचा मृतदेह सापडला त्या ठिकाणाहून थोड्याच अंतरावर एक स्कुटीही सापडली. स्कुटीच्या नंबरवरुन तरुणीची ओळख पटली.

याप्रकरणी पोलिसांनी सगळ्या आरोपींना अटक केली आहे. कारच्या नंबरवरुन पोलिसांनी आरोपींना शोधले आहे. मात्र, या प्रकरणात अनेक पैलूंवर चौकशी बाकी आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे स्पष्ट केले आहे की पोलिसांनी या प्रकरणात लवकरात लवकर अहवाल सादर करावा.

( हेही वाचा: फेसबुकवर झाली मैत्री, हाॅटेलवर गेली आणि बंदुक, दागिने घेऊन पळाली  )

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.