दिल्ली निवडणुकीचा (Delhi Election) निकाल लागून 10 दिवस झाल्यानंतर देखील भाजपाने नवीन मुख्यमंत्री कोण याबर अजूनही ठरविले नाही, यामुळे राजधानीत चांगलीच चर्चा रंगली आहे. सध्या रामलीला मैदानात (Ramlila Maidan) शपथ ग्रहण सोहळा होणार असल्याचे सांगितलं जात आहे. (Delhi Assembly Election 2025)
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री (Delhi Ramlila Maidan cm Oath) आणि त्यांची मंत्रीमंडळ 20 फेब्रुवारी रोजी रामलिला मैदान येथे शपथ घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, दिल्ली सरकारच्या शपथविधी आणि शासकीय स्थापनेसंदर्भात भाजपाने (BJP) सोमवारी रात्री महत्वाची बैठक आयोजित केली आहे.
(हेही वाचा – MSRTC ने ऑक्टोबरपासून ३००० कामगारांच्या पीएफची रक्कम भरली नाही)
दिल्लीत 27 वर्षानंतर भाजपाच्या ऐतिहासिक विजय झाला आहे. येत्या दोन दिवसात नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाऊ शकते. तसेच नवीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य 20 फेब्रुवारी रोजी रामलिला मैदान येथे शपथ घेऊ शकतात.
या संदर्भात भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून यात दलित मुख्यमंत्री (Dalit CM) की जाट मुख्यमंत्री (Jat CM) निवडायचा याचा महत्वाचा निर्णय होईल. शिवाय माहिला मुख्यमंत्री बद्दल देखील चर्चा आहे. पण बैठकीनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. शपथविधीच्या सोहळयाची जबाबदारी भाजपा सरचिटणीस विनोद तावडे (BJP General Secretary Vinod Tawde) आणि तरुण चुग यांच्याकडे सोपविली जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. बैठकीला दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि दिल्ली भाजपा संघटनेचे अधिकारीही उपस्थित असतील.
नवीन सरकारची शपथ घेण्याची तारीख, वेळ आणि ठिकाणही या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. शपथ घेण्याची तयारी, बसण्याची व्यवस्था आणि अतिथी यादी देखील अंतिम करण्यात येईल.शपथ ग्रहण सोहोळ्यात पक्षाच्या नियोजित राज्यांचे मुख्य मंत्री सामील होण्याची अपेक्षा आहे, तर बरेच वरिष्ठ नेतेही येथे उपस्थित असतील.
(हेही वाचा – India’s Got Latent: युट्यूबर Ranveer Allahbadia याला महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावला समन्स)
याशिवाय भाजपने 19 फेब्रुवारीला विधीमंडळ पक्षाची बैठक आयोजित केली असून, असून त्यात मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. यासाठी दोन निरिक्षक नेमले जाणार आहेत. तर, 20 फेब्रुवारीला ऐतिहासीक रामलीला मैदानावर साडे चार वाजता शपथविधी होणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, रालोआचे नेते, केंद्रीय मंत्री, उद्योगपती, बॉलिवूड कलावंत, क्रिकेटपटू आणि संत महात्मे कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.
(हेही वाचा – Ministry Building Renewal: मंत्रालयासमोरील प्रशासकीय इमारतीचे होणार नूतनीकरण, राज्य सरकार करणार ८२ लाखांचा खर्च )
मुख्यमंत्री पदाचे दावेदार
आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना पराभूत करणारे प्रवेश वर्मा (Pravesh Verma) मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. याशिवाय सतीश उपाध्याय, आशिष सूद, विजेंद्र गुप्ता यांच्या नावांची चर्चा आहे. महिलामधून माजी महापौर रेखा गुप्ता यांचे नाव सुध्दा चर्चेत आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community