- वंदना बर्वे
दिल्ली विधानसभेच्या या निवडणुकीत वेगळं चित्र बघायला मिळत आहे. वेगळं म्हणजे मागच्या निवडणुकीत जे नेते निवडणुकीच्या मैदानात होते ते आताही आहेत. मात्र, राजकीय पक्ष आणि निवडणूक चिन्ह बदललं आहे. दिल्लीत २२ दलबदलू उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. यातील कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते आणि पराभवाला सामोरे जातो हे निकालानंतरच कळू शकेल. आम आदमी पक्ष, भाजपा आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर केले आहे. यामुळे भाजपाने आपच्या नेत्यांना तिकीट दिले आहे. आप ने भाजपा आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना तिकीट दिले आहे. तर कॉंग्रेसनेही आप आणि भाजपातून आलेल्यांना तिकीट दिले आहे.
पाच वर्षांपूर्वी भाजपाने विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेससोडून आलेले २२ दलबदलू उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. भाजपात अनेक वर्षांपासून कार्य करीत असलेले नेते नाराज झाले होते आणि त्याचा मोठा फटका मागच्या निवडणुकीत बसला होता. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – Ashish Shelar यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले, बाळासाहेबांना पुरात…)
दलबदलूंना धडा मिळाला
२०२० च्या निवडणुकीत पक्षांतर करणाऱ्या १४ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात ताल ठोकली होती. यातील सात जण आपच्या तिकीटावर लढले होते आणि सर्वच विधानसभेत पोहचे. भाजपाला मात्र मोठा फटका बसला होता. भाजपाच्या तिकीटवर लढणार बहुतांश पराभूत झाले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजपा आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांची यादी पाहिली तर असे २२ उमेदवार आहेत ज्यांनी आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. भाजपाने इतर पक्षातून आलेल्या ९ उमेदवारांना तिकिटे दिली आहेत. आम आदमी पक्षानेही नेत्यांना मैदानात उतरवण्याचे कार्ड खेळले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने इतर पक्षांमधून आलेले आठ उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसही या बाबतीत मागे नव्हती आणि पक्षाने पाच पक्षांतरित नेत्यांना उमेदवार म्हणून निवडून आणले आहे. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – Gujarat मध्ये गोमांस तस्करांकडून गोरक्षकावर हल्ला; हुसेन, वसीमसह ५ जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या)
मोठे नेतेही दुसऱ्या पक्षांकडून रिंगणात
भाजपाने ज्या आयातीत उमेदवारांना तिकीट दिले आहे त्यातील सर्वात मोठे नाव म्हणजे माजी मंत्री कैलाश गहलोत. भाजपाने बिजवासन मतदारसंघातून गेहलोत यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय राजकुमार आनंद यांना पटेल नगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अरविंदर सिंग लवली गांधीनगरमधून भाजपाच्या तिकीटवर मैदानात आहेत. राजकुमार चौहान मंगोलपुरीमधून, नीरज बसोया कस्तुरबा नगरमधून, कर्तार सिंग तंवर छतरपूरमधून, कपिल मिश्रा करावल नगरमधून, मनीष चौधरी ओखलामधून, प्रियंका गौतम कोंडलीमधून, नारायण दत्त बदरपूरमधून कमळच्या चिन्हावर लढत आहेत. आम आदमी पक्षाने सुध्दा सत्ताविरोधी लाट टाळण्यासाठी विद्यमान आमदारांना निकीट नाकारले आहे. त्यांच्या जागेवर नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. आम आदमी पक्षाने शाहदरा मतदारसंघातून जितेंद्र सिंह शांती, छत्तरपूरमधून ब्रह्म सिंह तंवर, तिमारपूरमधून सुरेंद्र पाल सिंह बिट्टू, कस्तुरबा नगरमधून रमेश पहेलवान, किराडीमधून अनिल झा, मटियालामधून सुमेश शौकीन, मेहरौलीमधून महेंद्र चौधरी आणि सीलमपूरमधून झुबेर अहमद याला उमेदवारी दिली आहे. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – Chief Minister Medical Assistance Cell होणार पेपरलेस; स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली सुरू होणार)
निवडणूक आणखी रोमांचक
कॉंग्रेसने आपमधून आलेल्या नेत्यांना तिकीट देऊन निवडणूक आणखी रोमांचक बनविली आहे. देवेंद्र सेहरावत यांना बिजवासन मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर आमदार अब्दुल रहमान यांना सीलमपूर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. मुंडका येथून धर्मपाल लाक्रा, किराडी येथून राजेश कुमार गुप्ता, ताहिर हुसेन यांना सीलमपूरमधून आणि बाबरपूर येथून हाजी मोहम्मद इशरक खान निवडणूक रिंगणात आहेत. या नेत्यांनी पक्ष बदलल्याने यावेळी निवडणूक लढाई अधिक रंजक बनत आहे. मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. (Delhi Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community