-
वंदना बर्वे
विधानसभांच्या निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरविण्यास भाजपाकडून उशीर करण्याची एकप्रकारे परंपरा सुरू झाली आहे. महाराष्ट्र, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपाला एकहाती सत्ता मिळाली होती.
यानंतरही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपाने बराच उशीर केला. असे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने आम आदमी पक्षाचे पानीपत करीत स्पष्ट बहुमत मिळविले. निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस होऊन गेले आहेत. मात्र, दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असेल? हे अजूनही कळलेले नाही. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – Sheikh Hasina यांची घोषणा; म्हणाल्या, बांगलादेशात पुन्हा जाणार; प्रत्येक हुतात्म्याचा बदला घेणार)
खास रणनीती
राजकीय विश्लेषकानुसार, मुख्यमंत्र्याची निवड करण्यास उशीर करण्यामागे भाजपाची खास रणनिती आहे. भाजपा उशीर करून बऱ्याच गोष्टींची पडताळणी करण्याचा प्रयत्न करते. यात पक्षात किती गट आहेत आणि गटबाजी करण्यात कोण-कोण आघाडीवर आहे. भाजपात शिस्तीला खूप महत्त्व दिले जाते. अशात पक्षाच्या शिस्तीला कुणी आव्हान देण्याचा प्रयत्न करतो काय, हे तपासण्याचे काम पक्षाकडून केले जात आहे. जर गटबाजी होत असेल तर त्यास आळा घालणे सोपे जावे असाही एक तर्क आहे. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – कोल्ड वॉरसंबंधी DCM Eknath Shinde यांनी केला खुलासा; म्हणाले, महायुतीमध्ये…)
जातीय समीकरणाचा समतोल साधणे
भाजपाला नवीन नवीन प्रयोग करायचे आहेत. यात प्रस्थापित नेत्यांऐवजी नवीन चेहऱ्याला संधी दिली तर त्यांच्यात सरकार चालविण्याची क्षमता आहे की नाही? हे तपासण्याचे काम या काळात केले जाते. नवीन चेहऱ्याला संधी दिली तर जुन्या नेते नाराज होऊ शकतात आणि त्यांच्याकडून बंडखोरी होऊ शकते. मात्र, भाजपात पक्षाचा निर्णय सर्वोपरी मानला जातो. यास कुणी आव्हान देत असेल तर त्याची ओळख पटविता येते आणि त्याचा बंदोबस्त करणे सुद्धा सोयीचे जाते.
याशिवाय, मुख्यमंत्रपदाचा चेहरा निवडताना केवळ सरकारचाच नव्हे तर जातीय समीकरणाचाही विचार करावा लागतो. हा विचार केवळ त्या राज्यापुरता मर्यादित नसून अन्य राज्यांमध्ये या निर्णयाचा काय प्रभाव होणार, याचा विचार केला जातो. नवीन चेहऱ्यांना संधी देऊन भाजपा नवीन लीडरशीप निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, हेही एक कारण आहे. (Delhi Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community