आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) हा ‘खोट्यांचे एटीएम मशीन’असल्याची टिका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी गुरुवारी प्रचार सभेत केली. तसेच अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपले गुरू अण्णा हजारे (Anna Hazare) यांचा विश्वासघात केला, जो गुरूंचा विश्वासघात करू शकतो तो जनतेचाही विश्वासघात करेल, अशा प्रखर शब्दात केजरीवाल यांना खडे बोल सुनावले. (Delhi Assembly Election 2025)
योगी म्हणाले की, दिल्लीत (Delhi) मूलभूत सुविधा नाहीत. आम आदमी पक्षाने दिल्लीचे चित्र कुरूप केले आहे, आम आदमी पक्षाला सत्तेवर येण्याचा अधिकार नाही. जर आपण मुख्यमंत्री या नात्याने आणि संपूर्ण मंत्रिमंडळ संगममध्ये स्नान करू शकतो, तर मी केजरीवालजींना विचारतो की ते आणि त्यांचे मंत्रिमंडळ यमुनेत स्नान करू शकतात का? केजरीवाल यांनी यमुनेला घाण नाल्यात रुपांतरीत केले आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. किरारीतील भाजपाचे विधानसभा उमेदवार बजरंग शुक्ला यांच्या समर्थनार्थ त्यांनी गुरुवारी जाहीर सभेला संबोधित केले.
(हेही वाचा – Republic Day : भारतपर्व महोत्सवात असणार महाराष्ट्राचा ‘मधाचे गाव’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ)
यमुनेचा ‘नाला’ केला
आप सरकारवर हल्लाबोल करताना योगी म्हणाले की, त्यांनी यमुनेला (Yamuna River) गलिच्छ नाल्यात रूपांतरित केले आहे. माझ्या संपूर्ण मंत्रिमंडळाने संगमात डुबकी घेतली. केजरीवालांचे मंत्रिमंडळ यमुनेत स्नान करू शकते का? ते म्हणाले की, दिल्ली निवडणुकीमुळे मला आज येथे येण्याची संधी मिळाली आहे, मला येथील रस्ते जवळून पाहण्याची संधी मिळत आहे. कालच मी प्रयागराजहून लखनौला आलो, या शतकातील पहिला महाकुंभ प्रयागराजमध्ये (Mahakumbh Prayagraj) भव्यपणे आयोजित केला जात आहे.
दिल्ली मध्ये कचराच ‘कचरा’
दिल्ली सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, मी स्वतः पाहतोय की रस्त्यावर खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे. तुम्ही एका व्यक्तीला आणि त्याच्या साथीदारांना ही सूट का दिली? दिल्लीत सर्वत्र कचरा इतका साचला आहे की संपूर्ण राजधानीची दयनीय अवस्था झाली आहे. आमच्या वाहनांना इथल्या गटाराच्या पाण्यातून जावं लागलं. केजरीवाल आपल्या भाषणातून वारंवार यूपीची चर्चा करत आहेत, पण यूपी संपूर्ण देशात मॉडेल म्हणून विकसित झाले आहे, हे त्यांनी विसरता कामा नये. दिल्ली आणि नोएडाचे रस्ते स्वतः पाहा. असे
(हेही वाचा – Larsen And Toubro : 90 तास काम करा सांगणाऱ्या कंपनीला सरकारकडून 70 हजार कोटींचा झटका)
10 दिवसांत 10 कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले.
योगी म्हणाले की, 13 जानेवारीपासून पौष पौर्णिमा या 10 दिवसांत आजपर्यंत 10 कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात (Triveni Sangam) पवित्र स्नान केले आहे. जर तुम्ही प्रयागराजला गेलात तर तुम्हाला उत्कृष्ट रस्ते मिळतील, कुठेही घाण होणार नाही आणि वीजही असेल.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community