- प्रतिनिधी
दिल्ली निवडणुकीमुळे राजधानीत थंडीत देखील वातावरण चांगलेच तापले आहे. राजधानीत प्रत्येक प्रांतानुसार भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची रणनीती आखली आहे. यानुसार मराठी भाषिकांना भाजपाकडे वळविण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांवर टाकण्यात आली आहे. या प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार पासून करणार आहेत. दिल्लीमधील मराठी भाषिकांसाठी प्रचार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर भाजपा मराठी प्रकोष्टच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बुधवारी दिल्लीमध्ये सत्कार देखील करण्यात येणार आहे. (Delhi Assembly Election)
तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे देखील दिल्ली मधील विविध भागात राहणाऱ्या मराठी भाषिकांसाठी भाजपाचा प्रचार करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही रॅली काढणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचण्याच्या मार्गावर आहे. 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणे आहे. अशात प्रचारासाठी उरलेल्या सात दिवसात भाजपाने पूर्ण शक्ती लावली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या खांद्यावर दोन-दोन मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. शिवाय, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना प्रचाराच्या मैदानात उतरविले जाणार आहे. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – Ranji Trophy : रोहित, यशस्वी व श्रेयस मुंबईच्या शेवटच्या साखळी सामन्याला मुकणार)
भाजपाने मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस प्रत्येक मतदारसंघात 20 हजार मते जास्त मिळविण्याचे लक्ष्य ठरविले आहे. प्रत्येक बुथवर किमान 50 टक्के मते आणि मागच्या तुलनेत मतदानात वाढ करण्याचेही टार्गेट निश्चित केले आहे. दिल्लीतील बहुभाषिकांची संख्या लक्षात घेता जवळपास 27 नेत्यांना 54 मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा आयोजित केल्या जाणार आहेत. (Delhi Assembly Election)
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांना दिल्ली कॅन्ट आणि वजीरपूर तर भाजपा महासचिव विनोद तावडे यांना जनकपुरी आणि उत्तम नगर या दोन मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची सभा झाली नसली तरी त्यांच्याकडे संगम विहार आणि बदरपूरची जबाबदारी देण्यात आली आहे. युवा आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनाही प्रचाराच्या मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू)
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान मालवीय नगर आणि ग्रेटर कैलाश, वने व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव मेहरौली आणि बिजवासन, गजेंद्र सिंह शेखावत नरेला आणि बवाना, मनसुख मांडवीय शकुरबस्ती आणि मादीपूर, माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर मुस्तफाबाद आणि करावल नगर, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आदर्श नगर आणि बुरारी मतदारसंघाची जबाबदारी सांभाळत आहेत. (Delhi Assembly Election)
भाजपाचे सरचिटणीस सुनील बन्सल शालीमार बाग आणि त्रिनगर, खासदार निशिकांत दुबे रिठाला आणि किराडी, खासदार विवेक ठाकूर द्वारका आणि सुरेंद्र नगरची जबाबदारी सांभाळत आहेत. याशिवाय, दिल्लीतील भाषानिहाय वस्त्यांमध्ये प्रचार करण्यासाठी हायकमांडने संबंधित राज्यातील मंत्री, आमदार, खासदारांना कामाला लावले आहे. (Delhi Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community