Delhi Assembly Election : भाजपाला दिल्ली काबीज करता आली कारण…

45
Delhi Assembly Election : भाजपाला दिल्ली काबीज करता आली कारण...
Delhi Assembly Election : भाजपाला दिल्ली काबीज करता आली कारण...

दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) भाजपाने ४८ जागा जिंकून प्रचंड विजय मिळवून इतिहास रचला आहे. १९९३ नंतर पहिल्यांदा दिल्लीत भाजपाने सत्तावापसी केली आहे. भाजपाच्या या ऐतिहासिक यशामागे बूथ पातळीपासून मोठ्या स्तरापर्यंत तयारी करण्यात आली होती.

भाजपाने ही निवडणूक एका मिशनप्रमाणे लढली होती आणि इतर पक्षांच्या तुलनेत जबरदस्त प्लानिंग केलं होतं. त्यांची हीच प्लानिंग आणि तयारीचा परिणाम म्हणजे भाजपाला मिळालेलं जबदरस्त यश. रॅली असो वा रोड शो, मायक्रोमॅनेजमेंट लेव्हलवर काम करणे आणि प्रत्येक पातळीवर तयारी असल्यामुळे भाजपाने आपचा दिल्लीत सुपडा साफ केला. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – Mumbai Fire: ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग; १५० दुकानं जळून खाक)

महिलांच्या ७,५०० बैठका, प्रत्येक केंद्रीय मंत्र्यावर जबाबदारी

पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) दिल्लीत तीन रॅली घेतल्या होत्या. या रॅलीच्या माध्यमातून मोदींनी विविध वर्गातील मतदारांशी संवाद साधला. भाजपा दिल्लीत सत्तेत आली तर विकास निश्चित होईल, असा विश्वास मोदींनी मतदारांच्या मनात निर्माण केला. याशिवाय अमित शाहांनी (Amit Shah) दिल्लीत १६ रॅली घेतल्या. जेपी नड्डा (J. P. Nadda) यांनी सहा रॅली घेतल्या. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सहा रॅली घेतल्या.

भाजपाने प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांना दोन विधानसभा जागांची जबाबदारी दिली होती. शेजारील राज्यांतील आमदार, मंत्री आणि खासदारांना बोलविण्यात आलं होतं. योगी आदित्यनाथांव्यतिरिक्त देवेंद्र फडणवीस, हेमंत बिस्वा सरमा, पुष्कर सिंह धामी, भजन लाल शर्मा, नायब सिंह सैमी आणि मोहन यादव यांच्यावरही जबाबदारी देण्यात आली होती. पूर्वाचल चेहऱ्यांपैकी मनोज तिवारी, रवि किशन, दिनेश लाल यादव यांनीही पक्षाचा मोठा प्रचार केला. दलित वर्गासह ४५०० हून अधिक, महिलांसह ७५००, मुस्ली समाजासह १७०० बैठक घेण्यात आल्या. ओबीसी समाजासह पाच हजारांहून अधिक बैठका झाल्या. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकात भारत – पाक सामन्यातील पंच ठरले, जाणून घ्या नावं?)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही प्रचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दहा हजारांहून अधिक ड्रॉइंग रूम बैठका घेतल्या. त्यांनी मुस्लीम बुद्धिजीवींशी संपर्क साधण्यात आला. बिहार निवडणुकीच्या समन्वयात अडचणी येऊ नये यासाठी जेडीयू आणि एलजेपी यांना जागा देण्यात आल्या. प्रचारासाठी टीडीपी आणि जेडीयूच्या नेत्यांना बोलविण्यात आलं. चंद्राबाबू नायडू यांनी तेलगू भाषिक मतदारांशी संपर्क साधला. कर्नाटकातील भाजपा नेत्यांना कन्नड भाषिक मतदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी देण्यात आली. उत्तराखंड भाजपाच्या नेत्यांना पहाडी मतदारांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. (Delhi Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.