Delhi Assembly Election : दिल्लीतील राखीव मतदारसंघावर BJP चा फोकस

64
Delhi Assembly Election : दिल्लीतील राखीव मतदारसंघावर BJP चा फोकस
  • प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाने (BJP) आपला फोकस आता दिल्ली विधानसभा निवडणुकीवर केंद्रीत केला आहे. मागील निवडणुकीत ज्या मतदारसंघात भाजपाच्या उमदेवारांचा पराभव झाला होता अशा मतदान केंद्रावर जास्त मेहनत घेतली जात आहे. विशेषत: अनुसूचित जातीसाठी राखीव 12 मतदारसंघातील लोकांना भाजपाकडे वळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घटका जवळ येत आहे. दिल्लीची लढत तिरंगी होणार असली तरी मुख्य मुकाबला सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षात (BJP) आहे. यामुळे दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

(हेही वाचा – Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ॲडलेड कसोटीत असा असेल भारताचा अंतिम संघ)

12 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव

दिल्लीत 12 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. या मतदारसंघातील मतदार आणि अनुसूचित जातीतील लोकांचा पाठिंबा मिळविण्याचे आव्हान भाजपापुढे (BJP)  आहे. कारण, मागच्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी फार वाईट होती. यामुळे भाजपाची चिंता थोडी वाढली आहे. दिल्लीची सत्ता मिळवायची असेल तर या लोकांचे समर्थन मिळणे आवश्यक आहे, याची जाणीव मुख्य विरोधी पक्षाला बऱ्यापैकी झाली आहे.

ही बाब लक्षात घेऊनच भाजपाने (BJP) पुढची रणनीती आखली आहे. अनुसूचित जाती आघाडीचे कार्यकर्ते गेल्या चार महिन्यांपासून जनसंपर्क मोहीम राबवत आहेत. कुठलीही कमतरता भासू नये यासाठी इतर राज्यातील अनुसूचित जातीच्या नेत्यांना वेगवेगळ्या विधानसभांची जबाबदारी देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Elon Musk : एलॉन मस्कची एकूण संपत्ती ३५० अब्ज अमेरिकन डॉलरच्या पार, कशामुळे झाली एवढी वाढ?)

2014 आणि 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत या भागात भाजपाने (BJP) चांगले प्रदर्शन केले होते. परंतु, विधानसभेच्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाचे तोंड बघावे लागले होते. दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाला एकही आरक्षित जागा जिंकता आली नव्हती.

मात्र या निवडणुकीत जुन्या पराभवाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी भाजपाला (BJP) आशा आहे. आप आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढविली होती. तरीसुद्धा भाजपाला नऊ राखीव विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती. यामुळे भाजपाचा आत्मविश्वास बळावला आहे.

दिल्लीच्या जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास वाढला आहे. हा विश्वास आणखी बळकट करण्यासाठी भाजपाने आता रणनिती आखली आहे. भाजपाने (BJP) 30 अशा मतदारसंघाची यादी तयार केली आहे जेथे अनुसूचित जातीतील मतदारांची संख्या ३० टक्क्यांहून जास्त आहे. या भागात ऑगस्टपासून काम सुरू झाले आहे.

(हेही वाचा – ठरलं तर… Eknath Shinde उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार; उदय सामंत पत्र घेऊन राजभवनात दाखल)

कार्यकर्त्यांची टीम तयार

या भागातील प्रत्येक बूथवर 10 कार्यकर्त्यांची टीम तयार करण्यात आली आहे. आता या जागांवर हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, बंगाल, झारखंडमधून अनुसूचित जातीतून येणारे खासदार, आमदार, माजी मंत्री आणि राज्य अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. निवडणुकीपर्यंत ते इथेच राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपाला (BJP) कोंडली, त्रिलोकपुरी, की गोकलपुरी, देवळी, माडीपूर, पटेल से नगर, करोल बाग, मंगोलपुरी, बवाना राख आणि नांगलोई जाट विधानसभा मतदारसंघात भाजपला चांगले मतदान झाले होते. तर सीमापुरी, आंबेडकर नगर, या विधानसभा मतदारसंघात घट झाली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.