- प्रतिनिधी
निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. उमेदवारी अर्ज भरून ते परत घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, दिल्लीत सरकार स्थापन करण्याचा दावा करणारा कॉंग्रेस पक्ष कुठेच दिसत नाही! कॉंग्रेसच्या मोठ मोठ्या नेत्यांनी सुद्धा स्वत:ला प्रचारापासून लांब ठेवले आहे. कॉंग्रेसने मतदानापूर्वीच पराभव स्वीकारला आहे काय? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे. (Delhi Assembly Election)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी-वाड्रा हे नेते कॉंग्रेसचा आधार आहे. कॉंग्रेसचे भविष्य आहे. या नेत्यांच्या मर्जीशिवाय कॉंग्रेसमध्ये पान सुद्धा हलत नाही. असे असूनही, कॉंग्रेसचा एकही नेता उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेला नाही. मुख्य निवडणूक आयुक्तांनी ८ जानेवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा केली होती. यानंतर उमेदवारी अर्ज भरले गेले. अर्जाची छाननी झाली आणि अर्ज परत घेण्याची तारीखही निघून गेली. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – अजमेर दर्ग्याखाली शिवमंदिर असल्याचा दावा करणाऱ्या Vishnu Gupta यांच्यावर गोळीबार)
परंतु, कॉंग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यासह एकही राष्ट्रीय नेता कॉंग्रेसच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे दिसून येत नाही आहे. यामुळे कॉंग्रेसने निवडणुकीपूर्वीच पराभव स्वीकारला असल्याची चर्चा रंगली आहे. कॉंग्रेसच्या उमेदवारांमध्ये नाराजी आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांच्या काही रॅली होणार होत्या. मात्र, त्या सर्व रद्द करण्यात आल्या आहेत. राहुल गांधी यांच्या जाहीर सभा २२ ते २४ जानेवारी दरम्यान अनुक्रमे इंद्रलोक, मुस्तफाबाद आणि मादीपूर येथे सलग तीन दिवस आयोजित करण्यात आल्या होत्या. पण प्रचाराला जाण्याऐवजी राहुल गांधी थेट बिहारला एका कार्यक्रमात हजर होण्यासाठी निघून गेले. (Delhi Assembly Election)
दरम्यान कॉंग्रेसने राहुल गांधी यांच्या घसा खराब झाल्यामुळे त्यांच्या रॅली रद्द करण्यात आल्या असे सांगितले आहे. यास सत्य मानले तरी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी-वाड्रा प्रचारासाठी का पुढे येत नाही आहेत? हा प्रश्न आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान एकाच दिवसात अनेक ठिकाणी प्रचार करत आहेत. भाजपाचे विविध राज्यांतील नेते सुद्धा प्रचारसभा घेत आहेत. यास अपवाद फक्त एकच पक्ष आहे आणि तो म्हणजे कॉंग्रेस. (Delhi Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community