![](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2023/10/New-Project-83-696x377.webp)
-
प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला दिल्लीत जबरदस्त धक्का बसला आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पवार यांनी 30 उमेदवारांना तिकीट दिले होते. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकही उमेदवार आपली अनामत रक्कम वाचवू शकला नाही. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – Repo Rate Cut : रेपोरेट कपातीनंतर तुमचा हफ्ता किती रुपयांनी कमी होणार?)
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला भुईसपाट करीत भारतीय जनता पक्षाने बंपर विजय मिळविला आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुद्धा आपले उमेदवार उतरविले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकूण 30 उमेदवार उतरविले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस रालोआचा घटक पक्ष आहे. यानंतरही राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस 30 उमेदवारांना तिकीट दिले असले तरी प्रत्यक्ष 22 उमेदवारच उमेदवारी अर्ज दाखल करू शकले होते. उर्वरित उमेदवारांना अर्ज भरता आला नव्हता. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 22 उमेदवार मैदानात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार सभा सुद्धा घेतली होती. मात्र, एकाही उमेदवाराला आपली अनामत रक्कम वाचविता आली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ 0.03 टक्के मते मिळाली आहेत. यापेक्षा जास्त मते नोटामध्ये नोंदविण्यात आली आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत पवार यांनी 30 उमेदवारांना तिकीट दिले होते. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकही उमेदवार आपली अनामत रक्कम वाचवू शकला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ 0.03 टक्के मते मिळाली आहेत. यापेक्षा जास्त मते नोटामध्ये नोंदविण्यात आली आहेत. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – Ind vs Eng, 2nd ODI : जसप्रीत बुमराहच्या दुखापतीचा अहवाल शनिवारी मिळणार? चॅम्पियन्स करंडकातील सहभागावर लवकरच निर्णय)
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना पडलेली मते :
राष्ट्रवादी कॉंग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत दंड थोपटले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना मिळालेली मते. (Delhi Assembly Election)
मतदारसंघ
बादली 81, मतिया महल 56, बल्लिमारण 38, मोतीनगर 60, जनकपूरी 57, छतरपूर 173, संगमविहार 78, बदरपूर 273, लक्ष्मीनगर 48, शाहदरा 58, सीमापुरी 99, रोहतासनगर 91, घोंडा 46, गोकुलपूर 62 आणि करावलनगर 161 अशी मते मिळाली आहेत. (Delhi Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community