Delhi Assembly Election : मनीष सिसोदियांमुळे जंगपुरा मतदारसंघाकडे दिल्लीकरांचे लक्ष

28
Delhi Assembly Election : मनीष सिसोदियांमुळे जंगपुरा मतदारसंघाकडे दिल्लीकरांचे लक्ष
  • प्रतिनिधी

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघामधून निवडणूक लढत असल्यामुळे या मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. खरं तर जंगपुरा मतदारसंघाला आप पक्षाचा बालेकिल्ला म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघात आपचा उमेदवार विजयी होत आहे. भाजपाने तरविंदर सिंग मारवाह यांना तर कॉंग्रेसने माजी नगरसेवक फरहाद सुरी यांना उतरविले आहे. एकूण 9 उमेदवार रिंगणात आहेत. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली या पिढीतील सर्वोत्तम कसोटीपटूंच्या स्पर्धेतून बाहेर?)

जंगपुरा म्हणजे दक्षिण दिल्लीमधील पॉश एरिया. जंगपुरात एकूण एक लाख 48 हजार 290 मतदार असून 79931 पुरूष आणि 68355 महिला मतदार आहेत. यात 12 टक्के मुस्लिम, 16-18 टक्के शीख-पंजाबी, 25 ते 30 टक्के ग्रामीण मतदार आणि 25 टक्के शहरी मतदारांचा समावेश आहे. जंगपुरा म्हणजे दक्षिण दिल्लीचा पॉश एरिया. दरियागंजपासून ते लाजपतनगरपर्यंत हा मतदारसंघ पसरलेला आहे. सुंदर नगर या सारखी पॉश कॉलनी येथे आहे. मात्र, हजरत निजामुद्यीनचा दरगाह आणि हुमायूंचा मकबरा याच मतदारसंघात आहे. निजामुद्यीन आणि सराय काले खॉं नावाच्या मुस्लिमबहुल वस्त्या आहेत. भोगल आणि महारानीबाग नावाची शीखबहुल वस्ती सुद्धा आहे. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – MMRDA साठी एकच परिवहन सेवा करण्याचा अभ्यास सुरु; वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती देणार अहवाल)

आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया येथून लढत असल्यामुळे जंगपुरा हॉट मतदारसंघ झाला आहे. सर्वांच्या नजरा जंगपुरातील हालचालींवर टिकल्या आहेत. खरं म्हणजे, मनीष सिसोदिया हे पटपटगंजचे. अर्थात जंगपुरासाठी ते बाहेरचे आहेत असेच म्हणावे लागेल. हा सिसोदिया यांना महागात पडू शकणारा एक मुद्या सोडला तर उर्वरित सर्व बाजू जमेच्याच आहेत. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – ‘झिरो प्रीस्क्रिप्शन’ निर्णयाची अमंलबजावणी तात्काळ करावी ; Eknath Shinde यांचे निर्देश)

भाजपासाठी जंगपुरा आव्हान

दिल्लीत आतापर्यंत सात निवडणुका झाल्या आहेत. मात्र, भाजपाला एकदाही जंगपुरा जिंकता आली नाही. चारवेळा कॉंग्रेस आणि मागच्या तीन टर्मपासून आप येथून विजयी होत आहे. मनीष सिसोदिया यांच्याबाबत बोलायचे झाले तर पतपडगंज या मतदारसंघातून ते तीन वेळा मोठ्या फरकाने जिंकले आहेत. 2013 मध्ये 11476, 2015 मध्ये 28761 आणि 2020 मध्ये 3207 मतांनी विरोधकांना पराभूत केले होते. दिल्ली विधानसभेची मुख्य लढत आप आणि भाजपामध्येच होणार आहे. मात्र कॉंग्रेस मैदानात असल्यामुळे लढत तिरंगी होईल असे म्हटले जाते. (Delhi Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.