- प्रतिनिधी
दिल्ली विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांकडून तयारी सुरू आहे. आम आदमी पार्टीने सर्व उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसने दोन याद्याही जाहीर केल्या आहेत. भाजपाने अद्याप उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. आता भाजपा मित्रपक्षांसोबत दिल्ली विधानसभा निवडणूक लढवू शकते. एनडीएची ताकद दाखवण्याच्या रणनीतीवर भाजपा काम करीत आहे. एकत्रित निवडणूक प्रचारासाठीही रणनीती आखण्यात आली आहे. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – WHO चे महासंचालक अपघातात थोडक्यात बचावले)
जेडीयू, लोक जनशक्ती पार्टी आणि जीतनराम मांझी यांच्या एचएएमने गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने जेडीयूला दोन आणि लोक जनशक्ती पक्षाला एक जागा दिली होती. नुकत्याच झालेल्या रालोआच्या बैठकीत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवरही चर्चा झाली, तर हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यात आले. एनडीएच्या घटकपक्षांनी एकत्र निवडणूक लढवली त्या झारखंडमधील पराभवाचा उल्लेख करण्यात आला. (Delhi Assembly Election)
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाने मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित केले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी आणि चिराग पासवान आदी दिल्लीत एनडीएचा प्रचार करू शकतात. दिल्लीतील पूर्वांचली मतदारांना मोठ्या संख्येने आपल्या गोटात आणण्यासाठी एनडीएचे बिहारचे नेते प्रयत्न करतील. दिल्लीत पूर्वांचली मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील सुमारे २५ टक्के मतदार दिल्लीत आहेत. बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील सुमारे २५ टक्के मतदार दिल्लीत आहेत. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – BJP चे ५ जानेवारीला ‘घर चलो’; प्रत्येक बूथवर २०० सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट)
काय आहे भाजपाची रणनीती ?
- भाजपाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट करायची आहे.
- या एकजुटीतून आम आदमी पार्टीला कडवी टक्कर द्यायची आहे.
- चिराग पासवान, नितीश कुमार, जीतनराम मांझी हे निवडणूक प्रचारात.
- दक्षिण भारतीय मतदारांसाठी चंद्राबाबू नायडू प्रचार करतील.
- दिल्लीतील मराठी मततदारांसाठी एकनाथ शिंदेही प्रचार करतील.
(हेही वाचा – Rajapur मधील रायपाटण येथे सापडला शिवकालीन ऐतिहासिक ठेवा)
वर्चस्व २० जागांवर
दिल्लीतील २० जागांवर पूर्वांचली मतदारांची चांगली पकड असल्याचे मानले जाते. गोकलपूर, मतियाला, द्वारका, नांगलोई, करावलनगर, जनकपुरी, त्रिलोकपुरी, बुरारी, उत्तमनगर, संगम विहार, जनकपुरी, त्रिलोकपुरी, किरारी, विकासपुरी आणि समयपूर बदली या जागांचा समावेश आहे. याशिवाय एकनाथ शिंदे आणि चंद्राबाबू नायडू मराठी आणि तेलुगू भाषिक मतदारांवर प्रभाव टाकू शकतात. दिल्लीत सुमारे ३० लाख दक्षिण भारतीय राहतात. (Delhi Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community