Delhi Assembly Election : आरपीआयची १५ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा

30
Delhi Assembly Election : आरपीआयची १५ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा
  • प्रतिनिधी 

अरविंद केजरीवाल दिल्लीतील सत्तेला निरोप देतील, असे सांगतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आरपीआय निवडणुकीत १५ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये केली. पत्रकारांसोबत संवाद साधताना आठवले म्हणाले की, दिल्ली निवडणुकीमध्ये काही जागावर उमेदवार निश्चित करण्यात आले आहे. तर उर्वरित जागांवर भाजपा उमेदवारांना पाठिंबा देणार आहे. दिल्लीत ऐतिहासिक बहुमताने भाजपाचे सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – श्रीकृष्ण जन्मभूमीवरील अतिक्रमणांच्या सर्व याचिकांवर Supreme Court मध्ये एकत्र सुनावणी होणार)

विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आम आदमी पक्षाला सत्तेपासून दूर करण्यासाठी काम करेल आणि काँग्रेसला पुन्हा दिल्लीत शून्य जागा मिळवून देण्यासाठी काम करेल, असे रामदास आठवले म्हणाले. दिल्लीत ऐतिहासिक बहुमताने भाजपाचे सरकार स्थापन होईल, असा दावा रामदास आठवले यांनी केला. दिल्लीतील १५ विधानसभा जागांवर पक्ष निवडणूक लढवणार असून उर्वरित जागांवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. दिल्लीतील जनता नवनवीन भ्रष्टाचाराने त्रस्त करणाऱ्या आम आदमी पक्षाचे सरकार या विधानसभा निवडणुकीत जनता उलथवून टाकेल, असा दावा रामदास आठवले यांनी केला. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – BJP Convention: शिर्डीत होणार भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन; या बैठकीत अमित शाहांसह २२ हजार पदाधिकारी उपस्थित राहणार)

रामदास आठवले पुढे म्हणाले की, देशाच्या राजधानीला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याऐवजी भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याचे आश्वासन देणाऱ्या ‘आप’ने पोकळ घोषणा केली आहे. रामदास आठवले यांनी दिल्ली सरकारवर निशाणा साधत म्हटले की, जागतिक दर्जाच्या शाळा बांधण्याचा दावा करणाऱ्या केजरीवाल यांनी दोन लाखांहून अधिक मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. दारू घोटाळ्याने संपूर्ण दिल्लीला बदनाम करण्याचे काम अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देईल, असे रामदास आठवले यांनी सांगितले. (Delhi Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.