- प्रतिनिधी
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आतापर्यंत ५८ उमेदवारांची घोषणा केली आहे. परंतु, उर्वरित १२ जागांवर खास उमेदवार उतरवून भाजपा सर्वांना आश्चर्यचकीत करण्याच्या तयारीत आहे. यात एक नाव माजी महिला व बालकल्याण विकास मंत्री स्मृती इराणी यांचे सुद्धा असू शकते. त्यांना दिल्ली कॅन्ट किंवा ग्रेटर कैलाश विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. स्मृती इराणी मैदानात उतरल्या तर निवडणुकीचा सामना अधिक रोमांचक होऊ शकतो. (Delhi Assembly Election)
दिल्ली विधानसभेची निवडणूक दिवसेंदिवस रंगात येत आहे. आम आदमी पक्षाने सर्व 70 जागांवर उमेदवार उतरविले आहे. तर, भाजपाने तीन याद्या जाहीर करून 58 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात प्रवेश वर्मा आणि रमेश बिधुडी या माजी खासदारांचा समावेश आहे. आता उरलेल्या 12 जागांवर चर्चित चेहरे उतरविण्याची तयारी भाजपाकडून केली जात असल्याची चर्चा आहे. (Delhi Assembly Election)
सध्या या 12 जागांवर भाजपाचे उमेदवार कोण असतील? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु, सर्वाधिक जी चर्चा रंगली आहे ती ‘कभी सास भी बहु थी’च्या माध्यमातून घराघरात पोहचलेली ‘तुलसी’ भाजपाच्या 12 उमेदवारांपैकी एक असू शकतात. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या विरोधात उतरविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यामुळे स्मृती इराणी यांना दिल्ली कॅन्ट किंवा ग्रेटर कैलाश विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. गेल्या मे महिन्यात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून स्मृती इराणी नेपथ्यात गेल्या होत्या. 2019 मध्ये त्यांनी राहुल गांधी यांचा पराभव करून अमेठी जिंकली होती. तत्पूर्वी 2009 मध्ये स्मृती इराणी यांनी दिल्लीच्या चांदणी चौकमधून निवडणूक लढविली होती. मात्र, कॉंग्रेसचे कपिल सिब्बल यांच्या हातून त्यांचा पराभव झाला होता. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – Atal Setu ची वर्षपूर्ती; वर्षाला धावली ८२ लाखांहून अधिक वाहने…)
भाजपाने हॉटसीटवर एका मोठ्या चेहऱ्याला दिली संधी
स्मृती इराणी यांना उत्कृष्ट भाषणे देण्याची कला अवगत आहे आणि त्या एक लोकप्रिय चेहरा आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह निर्माण होईल. शिवाय, त्यांच्याकडे भाजपचा चेहरा म्हणूनही पाहिले जाईल. यावेळी, निवडणुकीतील सर्व समीकरणे लक्षात घेऊन, भाजपने प्रत्येक प्रमुख जागांवर मोठे चेहरे उभे केले आहेत. नवी दिल्लीतून आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध माजी खासदार प्रवेश वर्मा निवडणूक लढवत असल्याने येथे स्पर्धा रंजक बनली आहे. त्याचप्रमाणे, कालकाजीमध्ये माजी खासदार रमेश बिधुरी यांनी मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात निवडणूक लढवल्यामुळे राजकीय स्पर्धा जोरदार झाली आहे. (Delhi Assembly Election)
इराणी यांना कोणत्या जागेवरून उमेदवारी द्यायची याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाज यांच्याविरुद्ध एक मजबूत चेहरा उभा करून भाजप त्यांना चौथ्यांदा विधानसभा जिंकण्यापासून रोखू इच्छित असल्याचे मानले जाते. २०१३ पासून, भारद्वाज ग्रेटर कैलाश प्रदेशातून आपचे आमदार म्हणून निवडून येत आहेत. (Delhi Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community