Delhi Assembly Election : निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी केली जाहीर

1 कोटी 55 लाखांहून अधिक मतदार करणार मतदान.

56
Delhi Assembly Election : निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी केली जाहीर
  • प्रतिनिधी 

दिल्लीमध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. आप, काँग्रेस आणि भाजपा या मुख्य राजकीय पक्षांसोबतच छोटे पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरायला सज्ज आहेत. यातच सोमवारी निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. यावेळी 1 कोटी 55 लाखांहून अधिक मतदार मतदान करणार आहेत. दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने ही यादी जाहीर केली आहे.

दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने सोमवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. यावेळी एक कोटी 55 लाखांहून अधिक मतदार आपल्या मताचा वापर करतील. निवडणूक आयोगाच्या मते, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीत एकूण १,५५,२४,८५८ मतदार आहेत. ज्यामध्ये 83 लाख पुरुष आणि 71 लाख महिला मतदारांचा समावेश आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – Kasganj Violence प्रकरणी एनआयए न्यायालयाने २८ आरोपींना सुनावली जन्मठेपेची शिक्षा)

या आठवड्यात निवडणुकीची तारीख जाहीर होऊ शकते

निवडणूक आयोगाकडून अनेक बैठका सुरू आहेत. 6 ते 10 जानेवारी दरम्यान निवडणुकीची तारीख जाहीर केली जाऊ शकते. मात्र, दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून तारखांची अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारीमध्ये संपतो

विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. त्याआधी दिल्ली विधानसभेच्या स्थापनेसाठी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी दिल्लीतील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून तयारी सुरू आहे. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – ६ जानेवारी २०२५ : Guru Gobind Singh यांची जयंती; जाणून घेऊया त्यांच्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी…)

मुख्य निवडणूक आयुक्त 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त होणार

निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार १८ फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत. अशा परिस्थितीत 18 फेब्रुवारीपूर्वी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, निवडणूक आयुक्तांनी राजकीय पक्षांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. याशिवाय आढावा बैठकही घेण्यात आली आहे. (Delhi Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.