Delhi Assembly Election : राजकीय पक्षांचे भविष्य स्थलांतरित मतदारांच्या हाती

31
Delhi Assembly Election : राजकीय पक्षांचे भविष्य स्थलांतरित मतदारांच्या हाती
  • वंदना बर्वे

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षासह ​सर्व राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी डावपेच आखायला सुरुवात केली आहे. दिल्लीच्या मूळ रहिवाशांव्य​तिरिक्त रोजगारासाठी दिल्लीत आलेल्या मतदारांची मते मिळविण्यासाठी खास योजना आखली जात आहे. यात सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि भाजपा आघाडीवर आहे.

​दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे. १७ जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अशातच, दिल्लीच्या निवडणुकीत राजकीय भविष्य बनविण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्याची तयारी सुरू केली आहे. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – “आम्ही ‘वार’ आडनाव असलेल्यांचा सन्मान करतो…”, मुनगंटीवारांचा उल्लेख करत CM Devendra Fadnavis काय म्हणाले?)

विशेष म्हणजे, दिल्लीला मिनी इंडिया म्हटलं जातं. कारण, देशातील प्रत्येक राज्याचे नागरिक ​येथे राहतात. केंद्र सरकारचे विविध कार्यालय दिल्लीत आहेत. यामुळे या ठिकाणी काम करणारे विविध राज्यांचे नागरिक नोकरीसाठी दिल्लीत आहेत. त्यांच्यासोबतच अन्य नागरिकही दिल्लीत रोजगार शोधण्यासाठी आले असल्यामुळे परप्रांतीयांच्या मोठमोठ्या वसाहती दिल्लीत तयार झाल्या आहेत.

प्रामुख्याने उत्तर भारतातील सर्व राज्यांचे लोक दिल्लीत जास्त आहेत. त्यातही उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि उत्तराखंडचे नागरिक रोजगारासाठी राजधानीत वास्तव्याला आहेत. याशिवाय, पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण आणि मध्य भारतातील लोकही येथे राहतात. म्हणूनच दिल्लीला मिनी इंडिया म्हटले जाते. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : पाकिस्तानने दिली फेब्रुवारीपूर्वी मैदान तयार ठेवण्याची हमी)

एका सर्वेक्षणानुसार, असंघटीत क्षेत्र जसे चहाची टपरी, छोले-भटुऱ्याचे दुकान, ढाबे, कंस्ट्रक्शन वर्क, रिक्षा चालविणे यासारख्या कामात ८० ते ९० टक्के उत्तर भारतीय आहेत. या लोकांच्या वस्त्या सुद्धा आहेत. अशाच प्रकारे, भोजपुरी, तमिळ, बंगाली, मराठी, कन्नड, मल्याळम अशा लोकांच्या सोसायट्या सुद्धा दिल्लीत मोठ्या प्रमाणावर आहे. राजकीय पक्षांनी या मतदारांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी विविध क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. उत्तर भारतीय मतदारांची मते मिळविण्यासाठी भाजपने भोजपुरी स्टार मनोज तिवारी, र​वी किशन, निरहुआ, दिनेश लाल यादव, राणी चॅटर्जी यासाख्या कलावंतांना प्रचाराच्या कामाला लावले आहे.

आम आदमी पक्षाने पंजाब आणि गुजरातसह दिल्लीतील पंजाबी-शीख नेत्यांना दिल्लीत प्रचारासाठी बोलाविले आहे. दिल्लीत अंदाजे १२ टक्के शीख आणि पंजाबी मतदार आहेत. दिल्लीतील जनकपुरी, मोती नगर, शाहदरा, राजेंद्र नगर, राजौरी गार्डन, तिलक नगर, पटेल नगर, गांधी नगर आणि ग्रेटर कैलाश यासारख्या मतदारसंघात शीख-पंजाबी मतदार निर्णायक भूमिकेत आहे. दक्षिण आणि पश्चिम दिल्लीमध्ये जाट-गुर्जर मतदारांच्या मर्जीशिवाय पान हलत नाही अशी स्थिती आहे. दिल्लीतील २०-२५ टक्के मतदार पूर्वांचलचा आहे. २८-२९ जागांवर त्यांचा थेट प्रभाव आहे. (Delhi Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.