Delhi Assembly Election : दिल्लीत उमेदवारीसाठी भाजपामध्ये जोरदार चुरस

43
Delhi Assembly Election : दिल्लीत उमेदवारीसाठी भाजपामध्ये जोरदार चुरस
Delhi Assembly Election : दिल्लीत उमेदवारीसाठी भाजपामध्ये जोरदार चुरस

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly Election) तिकीट मिळवण्यावरून भाजपामध्ये (BJP) जोरदार चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदारही उतरले आहेत.

दिल्लीतील निवडणूक (Delhi Assembly Election) फेब्रुवारीत होणे अपेक्षित आहे. त्या निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा होण्याआधीच आपने सर्व ७० उमेदवार जाहीर केले. तर, काँग्रेसनेही २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आता भाजपाकडून (BJP) चालू महिन्याच्या अखेरीस उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.

(हेही वाचा – Gujrat Accident : गुजरातमध्ये टायर फुटून दोन ट्रकची समोरासमोर धडक, स्फोटात 2 ठार, 3 जखमी)

माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदारही शर्यतीत

भाजपाच्या दिल्ली निवडणूक (Delhi Assembly Election) समितीने संभाव्य २३० उमेदवारांची निवड केली आहे. त्यामधून पक्षाची केंद्रीय निवडणूक समिती अंतिम ७० उमेदवार निश्चित करेल. प्रत्येक मतदारसंघातून ३ ते ४ नावांना संभाव्य उमेदवारांमध्ये स्थान मिळाले आहे. त्यामध्ये बड्या नेत्यांचाही समावेश असल्याने तिकीट मिळवण्यासाठी भाजपामध्ये (BJP) मोठी रस्सीखेच असल्याचे सूचित होत आहे. हर्षवर्धन, मीनाक्षी लेखी हे माजी केंद्रीय मंत्रीही विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे समजते.

माजी खासदार प्रवेश वर्मा (Parvesh Verma) यांनी तर नवी दिल्लीमधून लढण्याची तयारी करण्याचा आदेश केंद्रीय नेतृत्वाकडून आल्याचा दावा केला आहे. त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व २०१३ पासून आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) करत आहेत. भाजपाचे अनेक आजी- माजी पदाधिकारीही तिकिटाच्या शर्यतीत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.