Delhi Assembly Election : स्मृती इराणी-बांसुरी स्वराज यांच्यात वर्चस्वाची लढाई

176
Delhi Assembly Election : स्मृती इराणी-बांसुरी स्वराज यांच्यात वर्चस्वाची लढाई
  • वंदना बर्वे

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशात दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी लॉबींग करणे सुरु झाले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यात आघाडीवर आहेत दिल्लीतील दोन महिला. भाजपाच्या दोन महिलांमध्ये दिल्लीचे नेतृत्व करण्याच्या मुद्यावरून वर्चस्वाची लढाई सुरु झाली असल्याची चर्चा देशाच्या राजधानीत रंगली आहे. (Delhi Assembly Election)

यातील एकीचा दावा आहे की, त्यांची कर्मभूमी दोन राज्य असले तरी जन्म मात्र दिल्लीत झाला आहे. मी येथेच जन्मली, शिकली आणि वाढली असा त्यांचा दावा आहे. तर दुसऱ्या नेत्या ही दिल्लीतीलच आहेत. पण त्या जुनिअर आहेत. पहिल्या महिल्या नेत्याचे नाव आहे माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि दुसऱ्या महिला नेत्याचे नाव आहे खासदार बांसुरी स्वराज. बांसुरी स्वराज जुनिअर असल्या तरी त्या खूप लवकर लोकप्रिय झाल्या आहेत. शिवाय स्थानिक नेते त्यांच्या पाठीशी आहेत.(Delhi Assembly Election)

(हेही वाचा – BMC : अंधेरीत नाल्यात पडून महिलेचा मृत्यू; आयुक्तांनी नेमली उच्चस्तरीय चौकशी समिती)

लोकसभेच्या निवडणुकीत अमेठीतून पराभव झाल्यापासून स्मृती इराणी फरशा सक्रिय नव्हत्या. मात्र आता त्या दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होण्यासाठी संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या दीड दोन महिन्यापासून त्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत असून दिल्लीत काम करण्याची इच्छा असल्याचे त्या बोलून दाखवीत आहेत. (Delhi Assembly Election)

माझी कर्मभूमी मुंबई आणि अमेठी असली तरी माझा जन्म दिल्लीत झाला आहे. येथे शिकली आणि वाढली आहे. करिअरसाठी मुंबईला जावं लागलं. पण करिअरसाठी प्रत्येकजण कुठे ना कुठे जातो, असा तर्क त्या देत आहेत. स्मृती इराणी यांचा दिल्लीतील पक्षीय कार्यक्रमांमधील वावर वाढला आहे. यामुळे त्या दिल्लीच्या राजकारणात त्या सक्रिय होऊ शकतात, असे संकेत आहेत. मात्र, स्मृती इराणी यांना स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. दुसरीकडे, या नेत्यांचा बांसुरी स्वराज यांना पाठिंबा आहे. दोन महिलांमधील वर्चस्वाची लढाई कुठपर्यंत जाते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Delhi Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.