Delhi Assembly साठी भाजपाने २९ उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर; आतापर्यंत किती महिलांना तिकीट मिळाले?

32
Delhi Assembly साठी भाजपाने २९ उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर; आतापर्यंत किती महिलांना तिकीट मिळाले?
Delhi Assembly साठी भाजपाने २९ उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर; आतापर्यंत किती महिलांना तिकीट मिळाले?

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी (BJP Candidate List) जाहीर झाली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत २९ उमेदवारांची नावे आहेत. यापैकी कपिल मिश्रा (Kapil Mishra) यांना करावल नगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. लक्ष्मी नगर विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा अभय वर्मा यांना तिकीट दिले आहे. वर्मा हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. भाजपने २९ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केल्यानंतर, ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५८ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. (Delhi Assembly)

( हेही वाचा : Torres Scam : टोरेस कंपनीने ‘लकी ड्रॉ’ मध्ये दिलेल्या कार पोलिस जप्त करणार

पक्षाने करावल नगरमधून विद्यमान आमदार मोहन सिंह बिष्ट यांना तिकीट दिलेले नाही. त्यांच्या जागी कपिल मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोती नगर येथून पक्षाने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांचे पुत्र हरीश खुराणा यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने शकूर बस्ती येथून भाजपच्या मंदिर सेलचे अध्यक्ष असलेले करनैल सिंह यांना तिकीट दिले आहे. या जागेवर आम आदमी पक्षाचे उमेदवार सत्येंद्र जैन आहेत. (Delhi Assembly)

५ महिला उमेदवारांना दिली उमेदवारी

भाजपाची (BJP) दुसऱ्या यादीत (BJP Candidate List) पाच महिला उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच याआधीच्या पहिल्या यादीत दोन महिला उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते. आतापर्यंत पक्षाने सात महिला उमेदवारांना तिकिट दिले आहे. त्यात दीप्ति इंदौरा, उर्मिला कैलाश गंगवाल, श्‍वेता सैनी , नीलम पहलवान, प्रियंका गौतम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Delhi Assembly) (BJP Candidate List)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.