देशाची राजधानी दिल्ली येथीन विधानसभा निवडणुकीची (Delhi Assembly Elections ) तारीख जाहीर झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ फेब्रुवारी रोजी निवडणुक होणार असून दि. ८ फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने दि. ७ जानेवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा (Delhi Assembly Elections ) कार्यक्रम जाहिर केला. यासह दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान दिल्ली विधानसभेची मुदत दि. २३ फेब्रुवारी रोजी संपणार असून त्याआधी नवे सरकार सत्तेत असेल. (Delhi Assembly Elections)
( हेही वाचा : Dhananjay Munde यांच्या अडचणी वाढणार; करुणा मुंडेंची उच्च न्यायालयात धाव)
मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहिर केला. ते दि. १८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होणार असल्याने दिल्ली विधानसभेची निवडणुक ही त्यांच्या नेतृत्त्वाखालील शेवटची निवडणुक असेल. दिल्लीनंतर देशात थेट बिहारच्या निवडणुका होणार असून त्यासाठी बराच कालावधी आहे. (Delhi Assembly Elections)
दिल्लीत सध्या आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) सरकार आहे. २०२० साली झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने ७० पैकी ६२ जागा जिंकत विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपाला (BJP) ८ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवला आला नव्हता. २०२० साली दिल्लीत ६२.८२ टक्के मतदान झाले असून मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास गेल्या निवडणुकीत आपला ५३.५७ टक्के मते मिळाली होती. भाजपला ३८.५१ टक्के मते तर काँग्रेसला ४ टक्के मते मिळली होती. (Delhi Assembly Elections)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community