दिल्ली विधानसभेच्या 70 जागासाठी मतदान झाले असून आता मतमोजणीची प्रतीक्षा आहे. 699 उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा निर्णय ईव्हीएममध्ये बंद झाला असून 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणे आहे. दिल्लीतील दीड कोटी मतदारांनी सत्तेची किल्ली कुणाच्या हाती दिली याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दिल्लीत 57.89 टक्के मतदान झाले आहे. (Delhi Assembly Elections)
(हेही वाचा- BMC Budget 2025-26 : मुदतठेवी ८३ हजार कोटींच्या, पण खर्च करता येणार फक्त ३९,५४३ कोटी रुपयेच)
निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांनी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदारांना प्रोत्साहित केले. मतदारांनी सुध्दा निवडणूक प्रक्रियेत उत्साहाने भाग घेतल्याचे बघायला मिळाले. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री आतिशी, आप प्रमुख अरविंद केजरीवाल आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला. (Delhi Assembly Elections)
दिल्लीत आम आदमी पक्ष सरकार स्थापनार की भाजपचा 27 वर्षांचा वनवास संपणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत. सोबतच, नवी दिल्ली, जंगपुरा, कालकाजी, रोहिणी, बदली, बाबरपूर, सीलमपूर आणि ओखला मतदारसंघातील निकालाकडेही लोकांचे लक्ष लागून आहे. आप प्रमुख अरविंद केजरीवाल, प्रवेश वर्मा, संदीप दीक्षित, मनीष सिसोदिया, आतिशी, रमेश बिधुरी, विजेंदर गुप्ता, देवेंद्र यादव आणि गोपाळ राय हे प्रमुख उमेदवार रिगणात होते. (Delhi Assembly Elections)
(हेही वाचा- BMC Budget 2025-26 : न्यायनिवाडा आणि थकबाकीपोटी महापालिकेची अडकली सुमारे ३३ हजार कोटींची रक्कम)
दिल्लीत १८ ते ३९ वयोगटातील ४५.१८, महिला मतदार ४६.३४ आणि ३०-५९ वयोगटातील ६५.९४ टक्के मतदार आहेत. दिल्लीत अनेक तरुण वयाच्या २४-२५ व्या वर्षी काम करायला सुरुवात करतात. अशा परिस्थितीत, नोकरी करणाऱ्या व्यावसायिक आणि काम करणाऱ्या वयाच्या मतदारांची संख्या ७० टक्क्यांहून अधिक आहे. (Delhi Assembly Elections)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community