Delhi Assembly Elections : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान सुरू ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

42
Delhi Assembly Elections : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान सुरू ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Delhi Assembly Elections : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान सुरू ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

दिल्ली विधानसभेच्या (Delhi Assembly Elections) ७० जागांसाठी बुधवारी (5 फेब्रु.) सकाळी ७ वाजता मतदान (Voting) सुरू झाले आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करू राहिल. यासाठी सुमारे १३ हजार मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. आम आदमी पक्ष (आप) (AAP) विरोधात भारतीय जनता पक्ष (BJP) तसेच काँग्रेस (Congress) असा तिरंगी सामना होणार आहे. (Delhi Assembly Elections)

हेही वाचा-Central Railway ची महाकुंभमेळ्यासाठी ८ अतिरिक्त विशेष गाड्यांची सेवा

राजधानीत (Delhi Assembly Elections) एकूण एक कोटी ५६ लाख मतदार आहेत. मतटक्का वाढविण्यासाठी विविध व्यावसायिकांनी सवलती जाहीर केल्या आहेत. भाजपने यंदा जोरदार प्रचारमोहीम राबवली आहे. अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’ सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याच्या प्रयत्नशील आहे. काँग्रेसला गेल्या दोन विधानसभा निवडणुकांत एकही जागा जिंकता आलेली नाही. (Delhi Assembly Elections)

एकूण जागा ७० (Delhi Assembly Elections)

मतदार १ कोटी ५६ लाख

मतदान केंद्र १३ हजार ७६६

एकूण उमेदवार ६९९

कडक बंदोबस्त तैनात (Delhi Assembly Elections)
निवडणूक आयोगाने (Election Commission) मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी खबरदारी घेतली आहे. यासाठी सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. निमलष्करी दलाच्या २२० तुकड्या, दिल्ली पोलीस विभागातील ३५,६२६ अधिकारी आणि कर्मचारी आणि १९००० होमगार्ड विविध मतदान केंद्रावर आणि शहरात तैनात करण्यात आले आहेत. ३००० मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे. तिथे कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया पार पडताना पोलीस ड्रोनच्या मदतीनेही नजर ठेवणार आहे. (Delhi Assembly Elections)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.