![Delhi Assembly Results : 'भ्रष्टाचाराचा 'शीशमहल' उद्ध्वस्त...' ; भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर अमित शाहांचे ट्विट Delhi Assembly Results : 'भ्रष्टाचाराचा 'शीशमहल' उद्ध्वस्त...' ; भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर अमित शाहांचे ट्विट](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/image-9-696x406.webp)
दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Results) भारतीय जनता पक्षाने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. भाजपने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या सत्तेला सुरुंग लावत 27 वर्षांनंतर दिल्ली मोठं यश मिळवलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (Delhi Assembly Results)
दिल्ली के दिल में मोदी…🪷
दिल्ली की जनता ने झूठ, धोखे और भ्रष्टाचार के ‘शीशमहल’ को नेस्तनाबूत कर दिल्ली को आप-दा मुक्त करने का काम किया है।
दिल्ली ने वादाखिलाफी करने वालों को ऐसा सबक सिखाया है, जो देशभर में जनता के साथ झूठे वादे करने वालों के लिए मिसाल बनेगा।
यह दिल्ली में…
— Amit Shah (@AmitShah) February 8, 2025
अमित शाह म्हणाले की, “दिल्लीच्या (Delhi) हृदयात नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आहेत. दिल्लीच्या जनतेनं खोटारडेपणा, धोकेबाजी आणि भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ उद्ध्वस्त करत दिल्लीला संकटमुक्त केलं आहे. जे लोक दिलेली आश्वासने पाळत नाहीत, अशा लोकांना दिल्लीच्या जनतेनं धडा शिकवला आहे.” (Delhi Assembly Results)
दिल्ली में झूठ के शासन का अंत हुआ है… यह अहंकार और अराजकता की हार है।
यह ‘मोदी की गारंटी’ और मोदी जी के विकास के विजन पर दिल्लीवासियों के विश्वास की जीत है।
इस प्रचंड जनादेश के लिए दिल्ली की जनता का दिल से आभार।
मोदी जी के नेतृत्व में भाजपा अपने सभी वादे पूरे कर दिल्ली को…
— Amit Shah (@AmitShah) February 8, 2025
“दिल्लीमध्ये आता विकास आणि विश्वासाचं एक नवं युग सुरू होणार आहे. दिल्लीत असत्याच्या सरकारचा शेवट झाला आहे. हा अहंकार आणि अराजकतेचा पराभव आहे. हा दिल्लीवासीयांनी मोदींची गॅरंटी आणि मोदींच्या विकासाच्या व्हिजनवर दाखवलेल्या विश्वासाचा विजय आहे. या प्रचंड विजयाबद्दल दिल्लीकरांचे मन:पूर्वक आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सर्व आश्वासनांची पूर्तता करून दिल्लीला जगातील सर्वोत्तम राजधानी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. लोकांनी मतदानातून दूषित झालेली यमुना नदी, पिण्याचे अस्वच्छ पाणी, खराब रस्ते आणि गल्लोगली निर्माण झालेल्या दारुच्या अड्ड्यांविरोधात आपला रोष व्यक्त केला आहे.” (Delhi Assembly Results)
दिल्लीवासियों ने बता दिया कि जनता को बार-बार झूठे वादों से गुमराह नहीं किया जा सकता। जनता ने अपने वोट से गंदी यमुना, पीने का गंदा पानी, टूटी सड़कें, ओवरफ्लो होते सीवरों और हर गली में खुले शराब के ठेकों का जवाब दिया है।
दिल्ली में मिली इस भव्य जीत के लिए अपना दिन-रात एक करने वाले…
— Amit Shah (@AmitShah) February 8, 2025
“दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या या दणदणीत विजयाबद्दल मी दिल्ली भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचं, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांचं अभिनंदन करतो. महिलांचा सन्मान, कॉलोनीवासियांचा स्वाभिमान आणि स्वयंरोजगाराच्या संधींसह मोदींच्या नेतृत्वात दिल्ली आता एक आदर्श राजधानी होईल.” असं अमित शहा म्हणाले आहेत. (Delhi Assembly Results)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community