Delhi Assembly Results : केजरीवालांच्या पराभवावर स्वाती मालीवाल यांचे सुचक ट्विट; म्हणाल्या ‘रावण का भी…’

125
Delhi Assembly Results : केजरीवालांच्या पराभवावर स्वाती मालीवाल यांचे सुचक ट्विट; म्हणाल्या 'रावण का भी...'
Delhi Assembly Results : केजरीवालांच्या पराभवावर स्वाती मालीवाल यांचे सुचक ट्विट; म्हणाल्या 'रावण का भी...'

दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Results) भारतीय जनता पक्षाने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. भाजपने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या सत्तेला सुरुंग लावत 27 वर्षांनंतर दिल्ली मोठं यश मिळवलं आहे. ‘आप’च्या या दारुण पराभवावर स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी सोशल साइट ‘एक्स’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण करतानाचे चित्र आहे. (Delhi Assembly Results)

स्वाती मालीवाल यांनी याबाबत काहीही लिहिलेले नसले तरी अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्वाती मालीवाल यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेशी संबंधित असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचे कपडेही फाटले होते. स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. (Delhi Assembly Results)

स्वाती मालीवाल यांनी X वर आणखी एक पोस्ट केली आणि लिहिले की, ‘अहंकार रावण का भी नहीं बचा था…’ माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया (Manish Sisodia) निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी ही पोस्ट केली आहे. (Delhi Assembly Results)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.