दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Results) भारतीय जनता पक्षाने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. भाजप अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या सत्तेला सुरुंग लावत 27 वर्षांनतर दिल्ली मोठं यश मिळवलं आहे. मात्र भाजप सत्तेत आली तर मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Delhi Assembly Results)
दुष्यंत कुमार गौतम (Dushyant Kumar Gautam)
या शर्यतीत एक प्रमुख नाव म्हणजे दुष्यंत कुमार गौतम. जे करोल बाग विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि दलित नेते आहेत. गौतम हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि विद्यार्थी राजकारणात सक्रिय आहेत. (Delhi Assembly Results)
प्रवेश वर्मा (Parvesh Verma)
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील लढतीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. भाजपाचे प्रवेश वर्मा, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्यात इथं तिरंगी लढत होत आहे. या हाय प्रोफाईल लढतीमध्ये प्रवेश वर्मा विजयी झाले तर ते ‘जायंट किलर’ म्हणून सिद्ध होतील. (Delhi Assembly Results)
अरविंद सिंग लवली (Arvind Singh Lovely)
अरविंद सिंग लवली हे दिल्लीचे गांधी नगरमधून भाजपचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार आहेत. दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेले सिंह दिल्ली निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सामील झाले होते. (Delhi Assembly Results)
विजेंदर गुप्ता (Vijender Gupta)
दिल्ली विधानसभा निवडणूक 2015 आणि 2020 मध्ये आम आदमी पक्षाची लाट होती. त्या लाटेतही विजेंदर गुप्ता यांनी त्यांचा रोहिणी विधानसभा मतदारसंघ राखला होता. माजी दिल्ली भाजपा अध्यक्ष असलेले गुप्ता दिल्ली विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते देखील होते. आम आदमी पक्षाच्या लाटेतही आपली जागा वाचवणारे अनुभवी विजेंदर गुप्ता भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. (Delhi Assembly Results)
सतीश उपाध्याय (Satish Upadhyay)
दिल्लीतील अनुभवी भाजपा नेते असलेले सतीश उपाध्याय हे दीर्घकाळ दिल्लीतील विद्यार्थी राजकारणाशी संबंधित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसंच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलं आहे. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चामध्ये त्यांनी महत्त्वाची पदं भूषविली आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकींच्या रणनितीमध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. निवडणूक प्रचाराच्या दरम्यानही भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडं पाहिले जात होते. (Delhi Assembly Results)
बासुरी स्वराज (Bassuri Swaraj)
भाजपच्या विजयात महिला मतदारांचा मोठा वाटा असल्याचीही चर्चा आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्रीपद एका महिला नेत्याकडे जाऊ शकते. पक्षाने सुषमा स्वराज यांच्या रूपाने एक महिला मुख्यमंत्री दिली होती. यावेळी त्यांची मुलगी बांसुरी स्वराज यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community