दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची प्रकृती ईडीच्या कोठडीत खालावली आहे. याबाबत ‘आप’ने दावा केला आहे की, केजरीवाल मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यामुळे त्यांच्या साखरेच्या पातळीत चढ-उतार होत आहे. त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी ४६वर गेली आहे. रक्तातील साखरेची पातळी एवढ्या खालच्या पातळीवर जाणे अत्यंत धोकादायक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
यापूर्वी त्यांच्या पत्नीने सीएम केजरीवाल यांचा संदेश वाचला होता. यापूर्वी ते म्हणाले होते की, अरविंदजी हे खरे देशभक्त, निडर आणि धैर्यवान व्यक्ती आहेत. त्यांना दीर्घायुष्य, आरोग्य आणि यशासाठी शुभेच्छा. माझे शरीर तुरुंगात आहेत, पण माझा आत्मा तुम्हा सर्वांमध्ये आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community