अंमलबजावणी संचालनालायाने अटक केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासह आम आदमी पक्षाचे वासे फिरू लागले आहेत. दिल्लीच्या रामलीला मैदानात रविवारी झालेल्या विरोधकांच्या रॅलीत अरविंद केजरीवालांचे होर्डिंग काँग्रेसने तडकाफडकी हटवले. यामुळे आपमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारवर आगपाखड करून देशाच्या राजकारणात अस्तित्वात आलेला आम आदमी पक्ष आता काँग्रेसच्या तावडीत सापडला आहे. काँग्रेस आता जुना हिशेब चुकता करण्यासाठी केजरीवाल यांची उपेक्षा करू लागला आहे. याचे जिवंत उदाहरण रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या रॅलीत बघायला मिळाले. (Congress)
दिल्लीच्या रामलीला मैदानात इंडी आघाडीची महारॅली झाली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटकेविरोधात आयोजित या रॅलीमध्ये काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल उपस्थित होत्या. सुनीता केजरीवाल व्यासपीठावर उपस्थित असतानाच काँग्रेसने स्टेजपुढे लावलेले अरविंद केजरीवाल यांचे होर्डिंग हटविण्यास सांगितले. काँग्रेसचे कार्यकर्ते होर्डिंग हटवू लागले. हे दृष्य सुनीता केजरीवाल आणि आप नेते पाहत होते. परंतू त्यांना काहीही करता आले नाही. आम आदमी पक्षाची अवस्था एवढी केविलवाणी झाली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांच्यावर तोंडसूख घेण्याशिवाय दुसरे काहीही करता आले नाही. देशाच्या विकासासाठी विरोधकांकडे कोणती योजना आहे हे सांगता सुद्धा आले नाही. (Congress)
(हेही वाचा – Summer Care: विदर्भासह राज्याच्या विविध भागांत उष्माघाताचा फटका, आरोग्य विभागाकडून सावधानतेचा इशारा)
केजरीवालांनी दिल्या ‘या’ सहा गॅरंटी
महारॅलीसाठी भलेमोठे स्टेज उभारण्यात आले होते. स्टेजच्या समोरील बाजूस केजरीवालांचे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरवर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने तो हटवण्यात आल्याची चर्चा आहे. रॅलीला सुरूवात होण्याआधीच हे पोस्टर हटवण्यात आल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. केजरीवाल (Arvind Kejriwal) तुरुंगात असल्याचे चित्र या पोस्टवर होते. पोस्टर का हटवले, याबाबत अद्याप आप किंवा इतर कोणत्याही पक्षांकडून स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, काँग्रेसचे नेते व्यासपीठावर इतर पक्षाच्या नेत्यांच्या तुलनेत उशिराने दाखल झाले. त्याआधी केजरीवालांचे पोस्टर हटवण्यात आले होते. त्यामुळे या पोस्टरला काँग्रेसचा विरोध असल्याच्या चर्चेने जोर धरला. (Congress)
अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी भाषणादरम्यान अरविंद केजरीवाल यांची सहा आश्वासने वाचून दाखवली. देशात कोणत्याही भागात वीजकपात केली जाणार नाही, देशातील सर्व गरिबांना मोफत वीज, प्रत्येक गावात सुसज्ज शाळा, दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकप्रमाणे देशातील प्रत्येक गावात असे क्लिनिक, प्रत्येक जिल्ह्यात सरकारी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, स्वामीनाथन रिपोर्टनुसार शेतमालाला किमान आधारभूत किंमत आणि दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला जाईल, अशा सहा गॅरंटी यावेळी केजरीवालांनी (Arvind Kejriwal) दिल्या. दरम्यान, पोस्टर का हटवले, याबाबत अद्याप आप किंवा इतर कोणत्याही पक्षांकडून स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, काँग्रेसचे नेते व्यासपीठावर इतर पक्षाच्या नेत्यांच्या तुलनेत उशिराने दाखल झाले. त्याआधी केजरीवालांचे पोस्टर हटवण्यात आले होते. त्यामुळे या पोस्टरला काँग्रेसचा विरोध असल्याच्या चर्चेने जोर धरला. (Congress)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community