हिंदू देवता आणि वीर सावरकरांचा अवमान केल्याबद्दल Rana Ayyub यांच्यविरोधात गुन्हा दाखल करण्याचा दिल्ली न्यायालयाचा आदेश

वकील अमिता सचदेवा यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील मजकूर प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) रूपांतरित करण्याचे आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिल्ली न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी हिमांशू रमण सिंह यांनी पोलिसांना दिले.

93

पत्रकार राणा अय्युब (Rana Ayyub) यांनी X वर हिंदू देवता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या ट्विटची पोलिस चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ट्विटमधून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि त्यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वकील अमिता सचदेवा यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील मजकूर प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) रूपांतरित करण्याचे आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश साकेत न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी हिमांशू रमण सिंह यांनी पोलिसांना दिले. “तथ्ये आणि परिस्थिती लक्षात घेता, तक्रारीत दखलपात्र गुन्हे उघडकीस आले आहेत, ज्यासाठी राणा अयुब (Rana Ayyub) यांच्याविरोधात एफआयआर दाखल होणे आवश्यक आहे. सध्याचे एसएचओ सायबर पोलिस स्टेशन, दक्षिण यांना तक्रारीतील मजकूर एफआयआरमध्ये रूपांतरित करण्याचे आणि प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,” असे न्यायालयाने निर्देश दिले. भारतीय दंड संहितेच्या कलम १५३अ (द्वेषपूर्ण भाषण), २९५अ (धार्मिक भावना दुखावणारे) आणि ५०५ (सार्वजनिक गैरवर्तन करणारे विधान) अंतर्गत प्रथमदर्शनी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यामुळे पोलिस तपासाची आवश्यकता आहे, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.

(हेही वाचा हुसेन दलवाईंनंतर Mallikarjun Kharge यांच्याकडून महाकुंभचा अवमान; म्हणाले, गंगेत डुबकी…)

वकील सचदेवा यांनी सुरुवातीला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66A अंतर्गत तक्रार दाखल केली होती. अयुबच्या (Rana Ayyub) ट्विट्मध्ये हिंदू श्रद्धांची पद्धतशीरपणे खिल्ली उडवण्याचा आणि त्यांना कमी लेखण्याचा, भारताचा अपमान करण्याचा आणि सांप्रदायिक तेढ पसरवण्याचा अजेंडा उघड होतो. राणा अयुब (Rana Ayyub) यांनी हिंदू देवतांचा अपमान केला आहे आणि भारतविरोधी भावना पसरवल्या आहेत, त्यामुळे दाखल केलेल्य तक्रारीवर तपास सुरू करण्यात पोलिसांनी निष्क्रियता दाखवली, त्यामुळे वकील सचदेवा यांनी दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता, कलम १५६(३) सीआरपीसी अंतर्गत न्यायालयीन अधिकाराचा वापर करून सध्याच्या प्रकरणात चौकशीचे आदेश देणे योग्य आहे असे न्यायालयाने म्हटले आहे.

राणा अयुबने कुणाचा केलेला अवमान? 

  • १३ मे २०१३ रोजी भगवान श्रीरामाचा अवमान करणारे ट्विट केले.
  • २९ मे २०१५ रोजी वीर सावरकर यांचा अवमान करणारे ट्विट केले.
  • ७ सप्टेंबर २०१५ रोजी वीर सावरकर यांचा अवमान केला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.