
दिल्लीत (Delhi) विधानसभा निवडणुकीची तयार सर्वच राजकीय पक्षांकडून सुरु झाली आहे. अशातच आम आदमी पक्षाने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्यानंतर असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या एमआयएम पक्षानेही दिल्लीतील उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे. त्यात एमआयएमच्या (AIMIM) यादीत २०२० मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीतील आरोपी ताहीर हुसैन (tahir hussain) यांना उमेदवारी दिली आहे. हुसैन आधी आपमध्ये होते. दंगलीतील आरोपांनंतर आपने त्यांचे निलंबन केले. गेल्यावेळी दिल्लीत झालेल्या महापालिका निवडणुकीत हुसैन यांनी विजय मिळवला होता.
( हेही वाचा : संविधान बदलणार हे Narrative असल्याची जयंत पाटलांची कबुली!)
अशातच ताहीर हुसैन यांच्या उमेदवारीची घोषणा करताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “दिल्लीतील नगरसेवक ताहीर हुसैन यांनी एमआयएम (AIMIM) पक्षात प्रवेश केला आहे. दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघात ते एमआयएमचे उमेदवार असणार आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि समर्थकांनी आज माझी भेट घेत पक्षात प्रवेश केला.”, अशी माहितीही ओवौसी यांनी दिली.
असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी ताहीर हुसैन (tahir hussain) यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा करताच दिल्लीतील भाजपाचे नेते कपिल मिश्रा म्हणाले की, “औवैसी यांनी अंकित शर्माच्या हत्येसाठी कारणीभूत असलेल्या व्यक्तीशी संबंध जोडले आहेत. ज्याच्या घरात बॉम्ब आणि दगडे सापडली होती. तसेच याने दिल्लीत शेकडो हिंदूंना मारण्याचा प्रयत्न केला होता. औवैसी यांनी लक्षात ठेवावे की, जर ताहीर हुसैन यांच्या नावावर आणखी एखादी दंगली झाली तर, याचे परिणाम त्यांच्या सात पिढ्यांना लक्षात राहतील.दरम्यान ताहीर हुसैन यांना २७ फेब्रुवारी २०२० मध्ये दंगल घडवल्याच्या आरोपातून नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.(Delhi)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community