दिल्ली विधानसभा निवडणुकीत गेली १० वर्षे सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचा (Aam Aadmi Party) दणदणीत पराभव झाला. (Delhi Election Result 2025) भारतीय जनता पक्ष २७ वर्षांनंतर राजधानीत सरकार स्थापन करणार आहे. दिल्लीत तर काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नसली, तरी काँग्रेसमुळे (Congress) आपचा अनेक जागांवर पराभव झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. ७० जागांपैकी १४ जागांवर काँग्रेसमुळे आपला पराभवाला सामोरे जावे लागल्याचे समोर येत आहे.
(हेही वाचा – देशात बनत आहे जगातील सर्वाधिक इंजिनक्षमता असलेली Hydrogen Fuel train)
इंडि आघाडीचा (India Alliance) भाग असलेल्या काँग्रेस आणि आपने दिल्ली निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये दिसून आला. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची युती झाली असती, तर आज वेगळे चित्र असते, असे म्हटले जात आहे. इंडि आघाडीच्या नेत्यांनीही याविषयी भाष्य केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत १४ अशा जागा आहेत जिथे भाजप आणि आपच्या उमेदवारांमधील अंतर काँग्रेसला मिळालेल्या मतांपेक्षा कमी आहे.
आपचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) स्वतः नवी दिल्लीच्या जागेसाठी रिंगणात होते. भाजपचे परवेश साहिब सिंग यांनी त्यांचा ४०८९ मतांनी पराभव केला. प्रवेश यांना ३००८८, केजरीवाल यांना २५९९९ मते आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या संदीप दीक्षित यांना ४५६८ मते मिळाली.
अनेक जागांवर पराभवाचे अंतर १५०० मतांपेक्षा कमी
भाजप आणि आपमधील अनेक जागांवर पराभवाचे अंतर १५०० मतांपेक्षा कमी आहे. संगम विहार मतदारसंघातून आपचे दिनेश मोहनिया यांचा ३४४ मतांनी पराभव झाला. भाजपचे चंदन कुमार चौधरी यांना ५४,०४९ तर मोहनिया यांना ५३,७०५ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार हर्ष चौधरी १५,८६३ यांना मते मिळाली. त्रिलोकपुरी जागेवर भाजपच्या रविकांत यांनी आपच्या अंजना परचा यांचा ३९२ मतांनी पराभव केला. रविकांत यांना ५८,२१७, तर परचा यांना ५७,८२५ मते मिळाली. तर काँग्रेसचे अमरदीप ६,१४७ मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
आपचे उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात भाजपच्या तरविंदर सिंग मारवाह यांनी जंगपुरा मतदारसंघात ६७५ मतांनी विजय मिळवला. मारवाह यांना ३८,८५९ मते मिळाली, तर सिसोदिया यांना ३८,१८४ मते मिळाली. काँग्रेसचे फरहाद सूरी यांना ७,३५० मते मिळाली. राजिंदर नगर जागेवर भाजपच्या उमंग बजाज यांनी आपच्या दुर्गेश पाठक यांचा १,२३१ मतांनी पराभव केला. बजाज यांना ४६,६७१ तर पाठक यांना ४५,४४० मते मिळाली. काँग्रेसचे विनीत यादव ४,०१५ मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. (Delhi Election Result 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community