Delhi Excise Scam: अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का; दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामिनाला स्‍थगिती? 

189
Delhi Excise Scam Case: अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का; दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामिनाला स्‍थगिती? 
Delhi Excise Scam Case: अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का; दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामिनाला स्‍थगिती? 

मद्य धोरण प्रकरणी उ‌द्भवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना मोठा झटका बसला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने (High Court) सुनावणी होईपर्यंत कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. म्हणजेच आता उच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून सुटणार नाहीत. (Delhi Excise Scam)

काय प्रकरण आहे

दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना २ जून रोजी संपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी २० दिवसांचा जामीन देण्यात आला होता. तेव्हापासून अरविंद केजरीवाल दिल्लीच्या तिहार तुरुंगात होते. दरम्यान, गुरुवारी २० जून रोजी अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा जामीन मिळाला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आम आदमी पक्षातही आनंदाची लाट उसळली होती. ‘आप’च्या अनेक नेत्यांनी हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले होते. (Delhi Excise Scam)

(हेही वाचा – Eknath Khadse यांनी रक्षा खडसेंसह घेतली अमित शहा यांची भेट, मोठी जबाबदारी मिळणार? राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

काय होता ईडीचा युक्तिवाद?

मात्र, एका दिवसानंतर या निर्णयाला अंमलबजावणी संचालनालयाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि न्यायालयाने याप्रकरणी केजरीवाल यांच्या जामिनाला स्थगिती दिली. ईडीने सांगितले की त्यांची बाजू अद्याप ऐकली गेली नाही आणि केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आमची बाजू ऐकून सुनावणी पूर्ण होईपर्यंत केजरीवाल यांना जामीन देऊ नये. याला सहमती दर्शवत न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या जामीनाला तूर्तास स्थगिती दिली आहे. (Delhi Excise Scam)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.