- ऋजुता लुकतुके
नवी दिल्लीत सुरू झालेल्या शेतकऱ्यांच्या संपामुळे (Delhi Farmers Protest) राजधानी दिल्लीतील कृषि व्यवहार काही अंश ठप्प झाले असून मागच्या काही दिवसांत ३०० कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीजने शनिवारी हा आकडा जारी केला आहे. शेती माल खरेदी करण्यासाठी नियमितपणे येणारे ५ लाख व्यापारी संपामुळे दिल्लीत आलेलेच नाहीत. त्याचा फटका राजधानीतील व्यापाराला बसला आहे. (Delhi Farmers Protest)
१३ फेब्रुवारीपासून दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांतून शेतकरी ‘चलो दिल्ली’चा नारा देत राजधानीच्या दिशेनं चालू लागले. त्यांच्या कृषि मालाला किमान हमी किंमत मिळावी या मागणीसह त्यांच्या इतरही मागण्या आहेत. पंजाबहून दिल्लीला निघालेल्या या शेतकऱ्यांना खनौरी आणि शंभू सीमेवर अडवण्यात आलं. सध्या तिथेच या शेतकऱ्यांनी आपले तंबू ठोकले आहेत. (Delhi Farmers Protest)
(हेही वाचा – Eknath Shinde: मनोहर जोशींचे घर जाळायला माणसे पाठवली, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप)
या होत्या शेतकऱ्यांच्या मागण्या
शेतमालाला किमान हमी रक्कम ही कायद्याने मिळावी या मागणीसह शेतकऱ्यांनी आणखीही मागण्या पुढे केल्या आहेत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी व्हावी, शेतकरी आणि शेतमजूरांना निवृत्तीवेतन मिळावं, आणि लखिमपूर-खेरी प्रकरणात शेतकऱ्यांवर दाखल झालेले खटले मागे घ्यावेत, अशा या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. (Delhi Farmers Protest)
आतापर्यंत शेतकरी आणि केंद्र सरकार (Central Govt) यांच्यात ३ वेळा चर्चा झाली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाकही दिली होती. ३ चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता १८ तारखेला रविवारी पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. शेतकरी नेत्यांनी आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असं धोरण ठेवलं आहे. आणि पंजाब तसंच हरयाणा सीमेवर ते ठाण मांडून आहेत. (Delhi Farmers Protest)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community