दिल्लीच्या (Delhi Government) नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांनी रमजानच्या काळात होणाऱ्या इफ्तार पार्टीच्या ( Iftar party) धर्तीवर ‘फलाहार पार्टी’ करण्याची नवीन योजना आखली आहे. या फलाहार पार्टीद्वारे दिल्ली सरकार (Delhi Government ) पुढील दोन आठवडे हिंदू नववर्ष (Hindu New Year) साजरे करणार आहे. त्यामुळेच दि. ३० मार्च रोजी हिंदू नववर्षानिमित्त (Hindu New Year) विधानभवन परिसरात संध्याकाळी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांपासून फलाहार पार्टीचे आयोजन केले जाईल. त्याची सांगता १४ एप्रिल आंबेडकर जयंतीला होईल. दिल्लीतील हजारो नागरिक या उत्सवात सहभागी होतील. विशेष म्हणजे कला आणि संस्कृती मंत्रालयच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
( हेही वाचा : Western Railway च्या एसी लोकल ‘या’ दिवशी नॉन-एसी म्हणून चालवल्या जाणार)
पहिल्यांदाच दिल्लीत हिंदू नववर्ष (Hindu New Year) आणि चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. ३० मार्च रोजी दिल्ली विधानसभेत कैलाश खेर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह, विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता (Vijendra Gupta) तसेच दिल्ली सरकारचे मंत्री आणि इतर भाजप नेते सहभागी होणार आहेत. (Delhi Government )
यापूर्वी दिल्ली सरकारने (Delhi Government) उर्दू अकादमीच्या सहकार्याने इफ्तार पार्टीचे (Iftar party) आयोजन केले होते, परंतु रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वातील सरकार पहिल्यांदाच ‘फलाहार पार्टी’ आयोजित करणार आहे. यंदा चैत्र नवरात्री ३० ते ७ एप्रिल पर्यंत असणार आहे. या काळात दुर्गा देवीची उपासना केली जाते. याच काळात दिल्ली सरकारकडून (Delhi Government) फलाहार पार्टी नागरिकांना निमंत्रम देण्यात येईल. हा तीन दिवसांचा कार्यक्रम असेल, जो सप्तमी, अष्टमी आणि नवमीच्या दिवशी होईल. दरम्यान मधल्या काळात हनुमान जयंती आणि रामनवमीचे कार्यक्रमही दिल्ली सरकारकडून आयोजित केले जातील. (Hindu)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community