सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) इमारतीच्या विस्तारासाठी, दिल्ली उच्च न्यायालयाने आवारात उभ्या असलेल्या २६ झाडांच्या पुनर्रोपणाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पांतर्गत, नवीन न्यायालये, संवैधानिक न्यायालये, न्यायाधीशांचे कक्ष आणि वकिलांसाठी चांगल्या सुविधा निर्माण केल्या जातील. (Supreme Court)
हेही वाचा-ट्रम्प-मस्क यांच्या धोरणांच्या विरोधात १२०० मोर्चे; अमेरिकेत होत आहे Hands Off Protests
वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकल्प विभाग-१ आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने (CPWD) उच्च न्यायालयात याचिका दाखल करून २६ झाडे पुनर्रोपणाची परवानगी मागितली होती. न्यायमूर्ती जसमीत सिंह यांच्या खंडपीठाने याला मान्यता दिली. (Supreme Court)
हेही वाचा- Indian Navy ने वाचवला पाकिस्तानी मच्छिमाराचा जीव ; समुद्रात केली शस्त्रक्रिया
यानंतर, कॅम्पसमध्ये असलेल्या १६ झाडांचे पुनर्रोपण सर्वोच्च न्यायालयाच्या गेट अ आणि ब दरम्यानच्या बागेच्या काठावर केले जाईल. तर १० झाडे गेट क्रमांक १ जवळील प्रशासकीय इमारतीच्या कोपऱ्यात हलवली जातील. झाडे लावण्याची परवानगी देण्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने २६ झाडांच्या जागी २६० नवीन झाडे लावण्याची अट घातली होती. सुनावणीदरम्यान, याचिकाकर्त्याच्या वतीने वकील सुधीर मिश्रा यांनी न्यायालयाला सांगितले की, ही सर्व २६० झाडे सुंदर नर्सरीमध्ये लावण्यात आली आहेत. (Supreme Court)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community