भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर काँग्रेसकडून नुकतेच गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पण याचबाबत आता दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्यांना दणका दिला आहे. इराणी आणि त्यांच्या मुलीवर आरोप करण्यात आलेले ट्वीट डिलीट करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्यांना दिले आहेत.
न्यायालयाचे आदेश
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीच्या मालकीचे गोव्यात एक रेस्टॉरंट असून त्यात अवैधरित्या मद्यालय चालवणात येत असल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम नरेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसूजा यांनी ट्वीट करत केला होता. याविरोधात स्मृती इराणी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. शुक्रवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्यांना फटकारले आहे.
(हेही वाचाः ‘मी राजीनामा द्यायला तयार’, शिंदे गटातील आमदाराने स्वीकारले ठाकरेंचे चॅलेंज)
आरोप करण्यात आलेले संबंधित ट्वीट 24 तासात डिलीट करण्यास सांगत, 18 ऑगस्ट रोजी या खटल्याच्या सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने जयराम नरेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसूजा यांना दिले आहेत.
काँग्रेसचे आरोप
स्मृती इराणी यांची कन्या जोईश इराणी त्यांचं गोव्यात सिली सोल्स कॅफे अँड बार नावे एक रेस्टॉरंट असून त्याव बेकायदेशीररित्या मद्यालय सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यामुळे इराणी यांची तात्काळ केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली आहे.
(हेही वाचाः ‘एक मिनिट असं बोलायचं नाही’, अजित पवारांनी पदाधिका-याला सुनावले)
पण हे आरोप निराधार असून आपली आणि आपल्या मुलीची बदनामी करण्यासाठी हे आरोप करण्यात येत असल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. त्यामुळे यासंदर्भात माफी मागण्यासाठी इराणी यांनी संबंधित काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे.
Join Our WhatsApp Community