केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्याबाण गोठवले, तसेच उद्धव ठाकरे यांच्या गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले, तसेच त्यांना मशाल ही निशाण दिली, तर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले, तर त्यांना ढाल तलवार निशाण देण्यात आले. या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर मंगळवार, १५ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. हा उद्धव ठाकरे गटाला झटका समजला जात आहे.
न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार
न्यायालयाने यावर आदेश देताना म्हटले की, आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय कायम राहणार आहे. तसेच धनुष्याबाण हे निशाण हे गोठवलेले असणार आहे. एकनाथ शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दोन गट तयार झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने दिल्ली उच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले. त्यावर न्यायालये उद्धव ठाकरे यांची याचिका फेटाळून लावली.
(हेही वाचा आफताबची आणखी एक क्रूर कृती, ४ हिंदू मुलींसोबत होते संबंध?)
Join Our WhatsApp Community