Rahul Gandhi : नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टीका प्रकरणी राहुल गांधींना उच्च न्यायालयाने सुनावले

353
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आक्षेप नोंदवला. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘पिकपॉकेट'(खिसेकापू) म्हणाले होते. त्यांची ही टीका योग्य नसल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. इतकेच नाही तर राहुल गांधी यांच्याविरोधातील या प्रकरणात योग्य निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आठ आठवड्यांची मुदत दिली आहे.
तसेच अशा विधानांबाबतचे नियम अधिक कडक करण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी २१ नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदींना खिसेकापू, पनौती मोदी, अशी टीका केली होती. मोदी टीव्हीवर येऊन कधी हिंदू-मुस्लिम करतात, तर कधी क्रिकेटच्या सामन्यांना जातात. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवणे, हे मोदींचे काम आहे, अशी टीका त्यांनी केली होती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.