दिल्ली उच्च न्यायालयाकडून आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे व संजय राऊतांना समन्स बजावण्यात आले आहे. खासदार राहुल शेवाळेंनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने समन्स बजावले असून प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
( हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कॉंग्रेसच्या शिदोरी मासिकावर कारवाई करावी – रणजित सावरकर)
आमदार-खासदारांच्या बदनामी प्रकरणी समन्स
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानी प्रकरणी याचिका दाखल केली होती. ज्या-ज्या आमदार व खासदारांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिले होते त्यांच्याबद्दल आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत, असा उल्लेख या याचिकेत करण्यात आला आहे. यानुसार या तिघांना प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे याकरता समन्स बजावण्यात आले आहे. स्वत: वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहून आरोपासंदर्भात स्वत:ची बाजू मांडावी अशा सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नोटीस
तसेच ज्या सोशल माध्यमांवर ही आक्षेपार्ह वक्तव्ये व्हायरल झाली होती. अशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अर्थात ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम यांनाही न्यायालयाने नोटीस बजावली आहे. तसेच तुमच्या प्लॅटफॉर्मवर अद्याप या तिघांनी आमदार-खासदारांबद्दल केलेली आक्षेपार्ह विधाने आहेत का अशी विचारणा या समाजमाध्यमांना उच्च न्यायालयाकडून करण्यात येत आहे आणि अजूनही या पोस्ट का हटवण्यात आल्या नाहीत याबाबत खुलासा करावा असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच या संदर्भात पुढील सुनावणी ही १७ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community