-
वंदना बर्वे
देशाच्या राजधानीत काय घडतंय याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. सध्या दिल्लीचा मुख्यमंत्री (Chief Minister) कोण होणार याकडे लक्ष आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मनात महिला मुख्यमंत्री देण्याचा विचार असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्षित, सुषमा स्वराज आणि अतिशी मार्लेना यांच्या नंतर पुन्हा एकदा दिल्लीला महिला मुख्यमंत्री (Chief Minister) मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी भाजपा महिला मुख्यमंत्री बनवण्याचा विचार करीत आहे.
भाजपा आमदार शालीमार बाग येथील रेखा गुप्ता, ग्रेटर कैलास येथील शिखा राय, वजीरपूर येथील पूनम शर्मा आणि नजफगड येथील नीलम पहलवान यांना आमदार म्हणून निवडण्यात आले आहे. यांच्या नावाची चर्चा सध्या दिल्लीत रंगली आहे. मात्र रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांच्या नावाला सर्वाधिक पसंती असल्याचे कळते आहे.
(हेही वाचा – बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करावी; आमदार Sangram Jagtap यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी)
परंतु या चार नावां व्यतिरिक्त एका पुरुष उमेदवारांचे नाव देखील चर्चेत आहे. ज्याचा दावा देखील मजबूत मानला जातो आहे.कारण परवेश सिंग वर्मा (Parvesh Verma) यांनी थेट केजरीवाल यांना हरविले आहे. खरं तर भाजपच्या विजया मध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. महिलांसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या. तर त्यांना 2500 रुपये देण्याचे आश्वासन देखील देण्यात आले. तसेच महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेच्या आश्वासनासह तब्बल 27 वर्षानंतर सत्तेत आलेली भाजपा बरेच नवीन बदल करेल असे बोललं जात आहे.
सरकारचे नेतृत्व एका महिला आमदाराकडे सोपविण्याबाबत भाजप गंभीर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी निवडणुकीच्या मेळाव्यात महिलांना वचन दिले होते की भाजप सरकारच्या स्थापनेनंतर आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आधी अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यावर येतील. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या आगमनानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सांगितलं जात आहे.
(हेही वाचा – Ind vs Eng, 3rd ODI : तिसऱ्या सामन्यातही आताचा संघ कायम हवा – संजय बांगर)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली प्रदेश भाजपा मध्ये रेखा गुप्ता (Rekha Gupta) सरचिटणीस आहेत. सध्या माहिला मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. सन 2022 मध्ये नगरसेवक म्हणून निवडल्या गेल्या होत्या. तर शिखा राय यांनी आपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांना ग्रेटर कैलाशकडून पराभूत केले. अशा परिस्थितीत रेखा आणि शिखाचा दावा मजबूत मानला जातो. जर असे झाले तर एक महिला मुख्यमंत्र्यांच्या जागी महिला मुख्यमंत्र्यांच असेल.
आपचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या राजीनाम्यानंतर, आम आदमी पक्षाने अतिशीला मुख्यमंत्री बनविले. यापूर्वी 10 वर्षांपासून कॉंग्रेसच्या न शीला दीक्षित दिल्लीची मुख्यमंत्री होत्या.भाजपच्या कार्यकाळात सुषमा स्वराज काही महिन्यांपर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री देखील होत्या. दरम्यान मुख्यमंत्री (Chief Minister) पदाच्या शर्यतीत सामील असलेले आमदार त्यांच्या प्रयत्नात गुंतले आहेत. असे मानले जाते की पंतप्रधान अमेरिकेतून परत आल्यानंतर या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community