Delhi Liquor Scam : दिल्लीतील आप खासदार संजय सिंह यांच्या घरावर ईडीचा छापा

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणाच्या तपासासाठी ईडीचे पथक सकाळी ७ वाजता संजय सिंह यांच्या घरी पोहोचले आणि शोध मोहीम सुरू आहे.

193
Delhi Liquor Scam : दिल्लीतील आप खासदार संजय सिंह यांच्या घरी ईडीचा छापा
Delhi Liquor Scam : दिल्लीतील आप खासदार संजय सिंह यांच्या घरी ईडीचा छापा

अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक आम आदमी पक्षाचे (आपचे) राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या घरी पोहोचले असून त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापे टाकले जात आहेत. (Delhi Liquor Scam) दिल्ली दारू घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता संजय सिंह यांच्या घरी पोहोचले. तेथे तपास सुरू आहे. ईडीने दारू घोटाळ्यात दाखल केलेल्या चार्टशीटमध्ये संजय सिंह यांचे नाव 3 ठिकाणी आहे. अद्याप यासंदर्भात ईडीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही आणि कोणत्या प्रकरणात हा छापा टाकला जात आहे, याची कोणतीही माहिती एजन्सीने दिलेली नाही. (Delhi Liquor Scam)

(हेही वाचा – Earthquake in Nepal : भूकंपानंतर नेपाळमध्ये पुन्हा विध्वंस; इमारतींचा झाला मलबा )

दिल्लीच्या वादग्रस्त दारू धोरण घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या चार्टशीटमध्ये संजय सिंहचे नाव तीन ठिकाणी आहे. यापूर्वी, 3 मे रोजी संजय सिंह यांनी दावा केला होता की, ईडीने दिल्ली अबकारी प्रकरणी आपल्या चार्जशीटमध्ये चुकून त्यांचे नाव समाविष्ट केले होते आणि ईडीने या प्रकरणी त्यांना पत्र लिहून खेद व्यक्त केला होता. नंतर ईडीने या प्रकरणी एक निवेदन जारी केले होते आणि या प्रकरणावर उत्तर देताना नोटीस मागे घेण्याबरोबरच मीडियामध्ये वक्तव्ये न करण्यास सांगितले होते. ईडीने सांगितले होते की, आरोपपत्रात संजय सिंहचे नाव 4 ठिकाणी लिहिण्यात आले होते, त्यापैकी ३ ठिकाणी नाव बरोबर लिहिले गेले होते, तर एका ठिकाणी राहुल सिंह ऐवजी संजय सिंह यांचे नाव देण्यात आले होते. ही चूक सुधारली आहे..

यापूर्वी या वर्षी मे महिन्यात संजय सिंगच्या जवळच्या नातेवाईकांवर छापे टाकण्यात आले होते आणि दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात ईडीने संजय सिंगचा जवळचा मित्र सर्वेश मिश्रा याच्या घराची झडती घेतली होती. सर्वेश मिश्रा हे आम आदमी पक्षाचे युवा नेते आणि आपचे खासदार संजय सिंह यांचे निकटवर्तीय आहेत, जे त्यांच्या अनेक राजकीय बाबी पाहतात. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी आधीच तुरुंगात आहेत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली होती. यानंतर मद्य घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा तपास करणाऱ्या ईडीने त्यांना अटक केली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.