तिहार जेलमध्ये ‘आप’च्या मंत्र्याचे ‘चाळे’, सोशल मीडियात व्हिडीओ तुफान व्हायरल

95
सध्या आम आदमी पक्षाचे नेते, दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन मनी लॉण्डरिंग प्रकरणी कारागृहात आहेत. आरोपी असतानाही त्यांची जेलमध्ये खुशामत सुरु असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये जैन यांचे चक्क मसाज केले जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होऊ लागला आहे. ट्विटरवर तर ‘तिहाड जेल’ म्हणून ट्रेंड होत आहे.

कारागृहात अनेकजण येतात भेटीला 

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने आम आदमी पक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी तिहार जेलमध्ये गुन्हेगारांसाठी मसाज पार्लर उघडल्याचे भाजपाने म्हटले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सत्येंद्र जैन यांचे जेलमध्येच मसाज होत आहे. त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक आहेत, जे त्याची सेवा करतानाही दिसतात. कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजचा हा व्हिडीओ आहे, जो सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सप्टेंबर महिन्यातील आहे. सत्येंद्र जैन व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या टी-शर्टमध्ये दिसत आहेत. जैन यांना जेलमध्ये व्हीव्हीआयपी सुविधा मिळत असल्याचे व्हिडिओवरून स्पष्ट झाले आहे. जैन यांना जेलमध्ये पिण्यासाठी मिनरल वॉटर मिळते, असे भाजपाचे हरीश खुराणा यांचे म्हणणे आहे, याचे पुरावेही दिसत आहेतयावरून जेलच्या संबंधित अधिकारी आणि तुरुंग कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी एका भाषणात बोलताना सत्येंद्र जैन जर दुसऱ्या देशात असतील तर त्यांना भारतरत्न दिला असता, असे म्हटले होते. त्यावरही सोशल मीडियात टीका होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.